बंद

महामुद्रा

महामुद्रा – प्रधानमंत्री मुद्रा योजना (पीएमएमवाई)
संकेतस्थळ:-https://mahamudra.maharashtra.gov.in

“महामुद्रा – प्रधानमंत्री मुद्रा योजना” वर आपले स्वागत आहे. मोबाइल फोन किंवा संगणकाद्वारे शक्य तितक्या कमी वेळेत प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज मिळविण्याची इच्छा असलेल्या लोकांना बँकेच्या कक्षेत आणण्यासाठी हे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. कर्ज मागणीचा अर्ज दाखल करणेसाठी आवश्यक कागदपत्रांची तसेच या प्रक्रियेबाबतच्या माहितीसाठी आता नागरिकाना बँकेच्या कार्यालयात प्रत्यक्ष न जाता ऑनलाईन कधीही आणि कोठूनही माहिती या संकेतस्थळाच्या माध्यमातून उपलब्ध केली आहे ज्यामुळे नागरिकांच्या वेळेची व श्रमाची बचत होऊ शकेल. माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून प्रधानमंत्री मुद्रा योजना अधिकाधिक लोकाभिमुख, गतिमान तसेच पारदर्शी होण्यासाठी या संकेतस्थळाची निश्चित मदत होणार आहे. रोजगार व स्वयंरोजगाराभिमुख विविध व्यवसायासंबंधीची माहिती तसेच त्याचे प्रशिक्षण कोठून घ्यावे इत्यादी प्रकाराची माहिती योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीस या संकेतस्थळाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचविण्याचा आमचा मानस आहे.