बंद

जिल्ह्याविषयी

वाशिम जिल्हयाची संकीर्ण संक्षिप्त  माहिती.

Ø वाशिम जिल्हया संबंधी इतिहास
Ø वाशिम जिल्हयाचे पूर्वीचे नाव वत्सगुल्म असे होते. वाशिम शहर वाकाटक राज्याची राजधानी होती. वाकाटक राज्यांनी तीस-या शतकपासून सहाव्या शतकापर्यंत राज्य केले. सदर राज्य हे मध्यप्रदेश पासून बेरार आंध्रप्रदेश पर्यंत होते. विन्ध्ये- शक्ती हा प्रथम वाकाटकचा राजा होता. सर्वसेन या राजाने वत्सगुल्म (वाशिम) ला राजधानी घोषित केले होते. त्यांचा हरीविजय व गाथासप्तषदी हे दोन ग्रंथ प्रसिद्ध आहेत. अजिंठा येथील लेण्यांना वाकाटक राज्यांनीच प्रोत्सहन दिल्याचे दाखले आहेत.
Ø जिल्हयाची स्थापणा दिनांक ०१ जुलै १९९८ रोजी झालेली आहे. वाशिम जिल्हयाची निर्मिती हि अकोला जिल्ह्याचे विभाजनातून झालेली आहे.
Ø वाशिम जिल्हयाच्या पूर्वेस यवतमाळ, उत्तरेस अकोला, ईशानेस अमरावती, पश्चिमेस बुलडाणा  व दक्षिनेस हिंगोली हे जिल्हे आहेत.
Ø  वाशिम जिल्हयामध्ये एकूण सहा तालुके आहेत.

(वाशिम,मालेगाव,रिसोड,मंगरूळ पीर,कारंजा व मनोरा)

 

वाशिम जिल्हयाची संकीर्ण संक्षिप्त माहिती.

  नदी
         वाशिम जिल्हयात पैनगंगा हि मुख्य नदी आहे. कास हि तिची मुख्य नदी आहे. कास नदी पैनगंगेस मसाला पेन या गावाजळ मिळते. अडाण नदी वाशिम तालुक्यात उगम पावते व मंगरूळपीर-मनोरा या तालुक्यातून वाहते.

पैनगंगा,काटेपुर्ण,मोर्णा अडाण,अर्नावती, बेम्बळा ह्या महत्वाच्या नद्या आहेत. पैनगंगा नदी हि पुढे गोदावरी नदीला मिळते.

पर्वत

 अजंठा पर्वत रांगेचा काही भाग मालेगाव तालुक्यातून जातो.

 हवामान व पर्जन्यमान.

पर्जन्यमान ७९८.७० मी.मी. एवढे आहे

जास्तीत जास्त तापमान ४५ ते ४८ सेंटी ग्रेड मे महिन्यात तर कमीत कमी तापमान ८ ते १० सेंटी ग्रेड  असते

 

वाशिम जिल्हयाची संकीर्ण संक्षिप्त माहिती.

Ø जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ४९०१.१९० चौ.कि.मी (१९९० चौ.मैल.)
Ø लोकसंख्या ११९७१६०(२०११ नुसार) (पुरुष ६२०३०२ स्त्री ५७६८५८)
Ø एकूण महाराष्ट्राच्या १.०६% एवढी लोकसंख्या जिल्ह्यात आहे.
Ø लोकसंख्या घनता २४४ प्रती चौ की.मी आहे
Ø ग्रामीण व नागरी लोकसंख्येचे प्रमाण : ८२.३४% ग्रामीन तर १७.६५ % शहरी
Ø दरडोई उत्पन्न  :- १४७३९९ रुपये .
Ø वाशिम जिल्ह्यातील स्त्री पुरुष प्रमाण १०००:९३० स्त्रीया आहे. (राज्याचे प्रमाण ९२९ आहे.)
Ø अनुसुचीत जातीचे प्रमाण एकूण लोकसंख्येसी १९.१७% तर अनुसुचीत जमातीचे प्रमाण ६.७२% आहे.
Ø साक्षरता दर ८३.२५% असून(९०.५५% पुरुष व ७५.४८ % स्त्रीया साक्षर आहेत)
Ø वयोगटा नुसार लोकसंख्येचे वर्गीकरण :

Ø ८७.२९% आहे.

०-६ वयोगटातील लोकसंख्येचे प्रमाण १२.७१% आहे व त्यावरील लोकसंख्येचे प्रमाण
Ø जिल्ह्यात रास्तभाव दुकाने ७७४ एवढे आहेत.
Ø जिल्ह्यात ग्रामपंच्यायतीची संख्या ४९४ आहेत.
Ø लोकसंख्या ११९७१६०(२०११ नुसार) (पुरुष ६२०३०२ स्त्री ५७६८५८)
Ø एकूण महाराष्ट्राच्या लोकसंख्याशी प्रमाण १.०६% एवढी लोकसंख्या जिल्ह्यात आहे.
Ø वाशिम जिल्ह्यामध्ये पिण्याच्या

 पान्याचे प्रमुख साधन

विहिरी आहेत.
Ø  त्यापैकी जलसिंचन विहिरीची संख्या ४१०९४ असून, वापरातील विहिरी ३५५०६ व नादुरुस्त विहिरी ५५८८ आहेत.
Ø वाशिम जिल्ह्यामध्ये

जलसिंचनाची साधने

कालवे ६९८१,

बांध  ६७५

विहिरी ४१०९४

Ø पोलीस ठाणे १३ आहेत.
Ø डाक कार्यालये १५२ आहेत
Ø प्राथमीक शाळा

मध्यमीक शाळा

महाविद्यालये

१०१८ आहेत,

२१६ आहेत.

४१ आहेत.

Ø सार्वजनिक दवाखाने मानसाकरिता

Ø  पशुवैद्यकिय

२३९

६२ आहेत.

Ø सहकारी संस्था १०२० आहेत
Ø महिला मंडळ ३३०३ आहेत.
Ø जिल्ह्यात एकूण नगर परीषद/ नगर पंचायती नगर परिषद -४

नगर पंचायती -२

Ø जिल्ह्यात एकूण  बँकेच्या शाखा जिल्ह्यात एकूण ११७ बँकेच्या शाखा असून दर लाख लोकसंख्ये माघे ८ अधिकोष कार्यालय आहेत.
Ø जमीन वापर एकूण लागवडी योग्य क्षेत्र ४२३२१० हे. आर. एवढे आहे.
Ø जंगल क्षेत्र ३७ हजार हे.आर. आहे (७.२१% आहे.)
Ø सिंचन क्षेत्र ३१४ हजार हे.आर..
Ø क्रीडांगनाखालील क्षेत्र ५४ हे. आर.आहे
Ø प्रमुख पिके   सोयाबीन  २९२९४२ हे. आर.

ज्वारी      ११०९ हे. आर.

गहू      २३९४७९ हे. आर.

Ø बागायती खालील क्षेत्र क्षेत्र ३४७५० हे.आर एवढे आहे.

 

वाशिम जिल्हयाची संकीर्ण संक्षिप्त माहिती.

जिल्हयामधून गेलेले निरनिराळे रस्ते असून त्यांची नावे व लांबी खालील प्रमाणे आहे.

अ.क्र मार्गाचे नाव लांबी की.मी
राष्टीय महामार्ग ८०
राज्य महामार्ग ५४०.३१
जिल्हा मार्ग ६४८.८०
इतर मार्ग की.मी ८८६.५०
ग्रामीण मार्ग ८२३.२०
रल्वे मार्ग ब्राडगेज ५१
नरो गेज २०

 

वाशिम जिल्हयाची संकीर्ण संक्षिप्त माहिती.

Ø जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ४९०१.१९० चौ.कि.मी (१९९० चौ.मैल.)
Ø लोकसंख्या ११९७१६०(२०११ नुसार) (पुरुष ६२०३०२ स्त्री ५७६८५८)
Ø एकूण महाराष्ट्राच्या १.०६% एवढी लोकसंख्या जिल्ह्यात आहे.
Ø लोकसंख्या घनता २४४ प्रती चौ की.मी आहे
Ø ग्रामीण व नागरी लोकसंख्येचे प्रमाण : ८२.३४% ग्रामीन तर १७.६५ % शहरी
Ø दरडोई उत्पन्न  :- १४७३९९ रुपये .
Ø वाशिम जिल्ह्यातील स्त्री पुरुष प्रमाण १०००:९३० स्त्रीया आहे. (राज्याचे प्रमाण ९२९ आहे.)
Ø अनुसुचीत जातीचे प्रमाण एकूण लोकसंख्येसी १९.१७% तर अनुसुचीत जमातीचे प्रमाण ६.७२% आहे.
Ø एकूण महसुली गावे ७९३
Ø एकूण आबाद  गावे ६९१
Ø एकूण उजाड गावे १०२
Ø एकूण महसुल मंडळ ४६
Ø एकूण तलाठी साझा २८०