Advertisement 2026 for establishing a new Aaple Sarkar Seva Kendra in Washim district.
सदर जाहिरात पाहण्यासाठी pdf स्वरुपात उपलब्ध येथे क्लिक करावे.
ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे .
शासन निर्णय दिनांक 19 जानेवारी 2018 मधील परिच्छेद क्र.2.5(क) मध्ये दिनांक 02 जून, 2025 रोजीच्या शासन शुध्दीपत्रकान्वये बदल करण्यात आला असून दिनांक 27 मार्च 2025 व दिनांक: 09 जुलै, 2026 अन्वये वाशिम जिल्ह्यातील शहरी भागातील 18 आणि ग्रामीण भागातील 203 असे एकुण 221 रिक्त असलेल्या गावाकरीता नवीन आपले सरकार सेवा केंद्रे स्थापन करण्यासाठी पात्र व इच्छुक व्यक्तींकडून ऑनलाईनद्वारे अर्ज मागविण्याकरीता जाहीरात प्रसिध्द करण्यात येत असल्याबाबत.
| अर्ज भरण्याची पध्दत | ऑनलाईन भरणे (अनिवार्य) |
| ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्याची सुरुवात | दि. 30/11/2026रोजी सकाळी 10.00 वाजता पासून |
| ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्याची अंतीम मुदत | दि.14/12/2026 रोजी दुपारी 05.00 वाजेपर्यंत |
| ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्यासाठी लिंक व
आपले सरकार सेवा केंद्र स्थापन प्रक्रियेबाबत सर्व आवश्यक सुचना |
|
| अर्जाची फी रु.500/- | ऑनलाईन पध्दतीने |
वाशिम जिल्ह्यातील शहरी भागातील 18 आणि ग्रामीण भागातील 203 असे एकुण 221 रिक्त असलेल्या गावाकरीता नवीन आपले सरकार सेवा केंद्रासाठी (भाग क्र.1 ते 6) मध्ये सविस्तर जाहिरात, आवश्यक पात्रता, अटी व शर्ती व तालुकानिहाय सेतु रिक्त असलेल्या गावाची यादी https://washim.gov.in या संकेतस्थळांवर सोबत संलग्न करण्यात आलेली आहे. तसेच अर्जदारांना कोणत्याही टप्प्यावर वैयक्तिक पत्रव्यवहार करण्यात येणार नाही. त्यामुळे अर्जदारांनी वेळोवेळी https://washim.gov.in या संकेतस्थळांवर भेट देऊन अद्ययावत माहिती प्राप्त करावी.
नवीन आपले सरकार सेवा केंद्र मंजुरी, निवड प्रक्रिया, केंद्रांचे वाटप तसेच संबंधित सर्व बाबींमध्ये अंतिम निर्णय घेण्याचे सर्व अधिकार जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हास्तरीय सेतू समिती, वाशिम यांचेकडे राखीव राहतील.
| टीप– | अर्जदारास शासन निर्णयामधील अटी शर्तीची पुर्तता करणे आवश्यक राहील. तसेच अर्जदारांनी ई-मेलवरील भरलेल्या अर्जाची प्रिंट काढुन त्यावर स्वाक्षरी करुन अर्जात नमुद केलेल्या संबधित माहितीच्या कागदपत्राचा संच जोडून त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी संबंधित तहसिल कार्यालयामध्ये सादर करणे बंधनकारक राहील. विहीत मुदतीनंतर /उशिराने प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केल्या जाणार नाही. |
भाग 1 : “आपले सरकार सेवा केंद्र” मिळण्याचे पात्रता खालील प्रमाणे
1) किमान पात्रताः
अर्जदाराने खालील अटी पूर्ण करणे आवश्यक राहील.
- किमान वय १८ वर्षे पूर्ण असावे.
- किमान शैक्षणिक पात्रता उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (HSC) उत्तीर्ण असावा.
- संगणकाचे मूलभूत ज्ञान आवश्यक राहील. MSCIT किंवा समतुल्य प्रमाणपत्रास प्राधान्य देण्यात येईल.
- संबंधित ग्रामपंचायत क्षेत्राचा स्थानिक रहिवासी असावा./ नगर पालीकेच्या बाबतीत संबधित वार्डातील स्थानिक रहिवासी असावा.
- आधार क्रमांक, पॅन, बँक खाते व आवश्यक ओळखपत्र उपलब्ध असावे.
- नैतिक अधःपतन, आर्थिक फसवणूक किंवा सायबर गुन्ह्या दाखल नसावा.
2) पायाभूत सुविधाः (अर्जाच्या छाननीनंतर या कार्यालयाकडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात येईल.)
प्रत्येक सेवा केंद्रामध्ये किमान खालील सुविधा असणे आवश्यक राहील.
- किमान 100 चौ. फुट कार्यालयीन जागा
- दोन संगणक /लॅपटॉप
- लेझर प्रिंटर
- स्कॅनर
- बायोमेट्रिक उपकरण
- वेबकॅम
- युपीएस अथवा पर्यायी वीज बॅकअप
- ब्रॉडबँड इंटरनेट (Minimum ग्रामीण 10 mbps /नागरी 20 mbps)
- सीसीटीव्ही व्यवस्था
- नागरिकांसाठी प्रतीक्षाकक्ष
- शासनप्राधिकृत सेवा शुल्क दर्शविणारा फलक व बाह्य नामफलक
3) मुलाखतः
- जिल्हास्तरीय निवड समितीमार्फत अर्जदारांची संरचित मुलाखत घेण्यात येईल. मुलाखतीमध्ये खालील बार्बीचे मूल्यांकन करण्यात येईल.
- शासकीय सेवांचे ज्ञान
- नागरिकाभिमुख सेवावृत्ती
- डिजिटल प्रणाली हाताळण्याची क्षमता
- समस्या सोडवण्याची क्षमता
- संवाद कौशल्य
- प्रामाणिकपणा व नैतिकता
- माहिती गोपनीयता व डेटा सुरक्षा याबाबत जागरूकता
4) निवड प्रक्रियाः
- अर्जाची प्राथमिक छाननी व पडताळणी.
- गुणांकनाच्या आधारे कागदपत्रांचे परीक्षण.
- प्रस्तावित कार्यालयाची प्रत्यक्ष पाहणी.
- पोलीस पडताळणी.
- जिल्हास्तरीय निवड समितीमार्फत संरचित मुलाखत.
- 100 गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी (Merit List) तयार करणे.
- गुणवत्ता यादी प्रसिद्ध करून हरकती मागविणे.
- अंतिम निवड व नियुक्ती आदेश देणे.
- अनिवार्य प्रशिक्षण व 6 महिन्यांचा परिविक्षाधिन कालावधी
- समाधानकारक कार्यप्रदर्शनानंतर नियमित मान्यता.
5) कार्यप्रदर्शनावर आधारित करार नुतनीकरणः
निवड झालेल्या VLE ला प्रारंभी 3 वर्षाचा करार देण्यात येईल. पुढील नुतनीकरण खालील कार्यप्रदर्शन निर्देशकांच्या आधारे करण्यात येईल.
- केलेल्या व्यवहारांची संख्या
- नागरिक समाधान निर्देशांक
- सेवा देण्यास लागणारा सरासरी कालावधी
- प्राप्त तक्रारींची संख्या व त्यांचे निराकरण
- लेखापरिक्षणातील अनुपालन
- प्रणालीची कार्यक्षमता (System efficiency)
- आर्थिक शिस्त
- शासनाच्या विविध मोहिमांमध्ये सहभाग
6) अपात्रता निकषः
खालील परिस्थितीत अर्जदारास अपात्र ठरवण्यात येईल.
- खोटी किंवा बनावट कागदपत्रे सादर करणे.
- कोणत्याही शासकीय योजनेतून काळ्या यादीत समाविष्ट असणे.
- आर्थिक फसवणूक अथवा सायबर गुन्ह्यांची गंभीर प्रकरणे प्रलंबित असणे.
भाग 2 : सविस्तर जाहिरात दस्तऐवज
निवड प्रक्रिया (Selection Process):
“आपले सरकार सेवा केंद्र” मंजूर करण्यासाठीचे निकष
जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत सेतू प्रभारी अधिकारी व जिल्हा समाजकल्याण अधिकारी हे संयुक्तरीत्या अर्जाची छाननी पार पाडतील. तसेच दि.23/08/2002 च्या शासन निर्णयान्वये स्थापित केलेल्या जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा सेतू समिती समोर सदर प्रस्ताव ठेवून आपले सरकार सेवा केंद्र मंजुर करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. आपले सरकार सेवा केंद्र प्रदान करण्यासाठी त्या-त्या भौगोलिक क्षेत्रात एकापेक्षा जास्त पात्र अर्ज प्राप्त झाल्यास खालीलप्रमाणे प्रक्रिया राबवून गुणांकन करण्यात येईल.
समितीव्दारे खालीलप्रमाणे गुणांकनाची व मुलाखतीची प्रक्रिया पार पाडण्यात येईल. तसेच सदर समितीचा निर्णय अंतिम असेल.
सदर निवड प्रक्रियेमध्ये 100 गुण निर्धारीत करण्यात येतील व गुणांची विभागणी खालीलप्रमाणे असेलः-
- गुणांकनावर आधारित निवड निकष (एकुण 100 गुण) (सोबत सविस्तर विवरण खालीलप्रमाणे आहे)
| अ.क्र. | निकष | गुण | मूल्यांकनाचे निकष |
| 1 | शैक्षणिक पात्रता | 10 | किमान उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (HSC) उत्तीर्ण; पदवी, पदविका किंवा व्यावसायिक पात्रतेस अतिरिक्त गुण
(किमान शैक्षणिक अहर्ता असल्यास 5 गुण, पदवी असल्यास 2 अतिरिक्त गुण, पदव्युत्तर असल्यास 3 अतिरिक्त गुण) |
| 2 | संगणक व डिजिटल साक्षरता | 15 | MSCIT किंवा समतुल्य प्रमाणपत्र, संगणक हाताळणी, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, सायबर सुरक्षा यांचे ज्ञान |
| 3 | पायाभूत सुविधा | 15 | स्वतंत्र कार्यालय, संगणक, प्रिंटर, स्कॅनर, बायोमेट्रिक उपकरण, इंटरनेट, वीज बॅकअप, सीसीटीव्ही, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी सुलभ प्रवेश |
| 4 | आर्थिक क्षमता | 10 | आवश्यक गुंतवणूक करण्याची व किमान 6 ते 12 महिने व्यवसाय चालविण्याची आर्थिक क्षमता |
| 5 | ग्राहक सेवा व संवाद कौशल्य (मुलाखतीद्वारे) | 20 | संवाद कौशल्य, तक्रार निवारण क्षमता, प्रामाणिकपणा व नागरिकाभिमुख दृष्टिकोन |
| 6 | अनुभव | 10 | सीएससी, महा-ई-सेवा केंद्र, बँकिंग प्रतिनिधी, ई-गव्हर्नन्स किंवा तत्सम क्षेत्रातील अनुभव |
| 7 | व्यवसाय आराखडा व शाश्वतता | 05 | सेवा विस्तार, जनजागृती, आर्थिक व्यवहार्यता आणि व्यवसाय नियोजन |
| 8 | सामाजिक समावेशकता | 05 | शासनाच्या धोरणानुसार दिव्यांग, माजी सैनिक, महिला, स्वयंसहाय्यता गट सदस्य किंवा स्थानिक उद्योजकांना प्राधान्य |
| 9 | चारित्र्य पडताळणी | 10 | पोलीस पडताळणी, फसवणूक, आर्थिक गैरव्यवहार किंवा शासकीय काळ्या यादीत नसणे |
| एकुण गुण | 100 | ||
सदर निवड प्रक्रियेमध्ये 100 गुण निर्धारीत करण्यात येतील त्या गुणांची सविस्तर विभागणी खालीलप्रमाणे असेल
- शैक्षणिक पात्रता (10 गुण) (शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र अपलोड करावे)
| अ.क्र. | मुल्यांकनाचे निकष | गुण |
| 1 | किमान उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (HSC) उत्तीर्ण; पदवी, पदविका किंवा व्यावसायिक पात्रतेस अतिरिक्त गुण (किमान शैक्षणिक अहर्ता असल्यास 5 गुण, पदवी असल्यास 2 अतिरिक्त गुण, पदव्युत्तर असल्यास 5 अतिरिक्त गुण) | 12 (HSC) उत्तीर्ण – 5 गुण |
| पदवी – 2 गुण | ||
| पदव्युत्तर पदवी – 3 गुण | ||
| एकुण | 10 |
- संगणक व डिजिटल साक्षरता (15 गुण) (प्रमाणपत्र अपलोड करावे)
| अ.क्र. | प्रमाणपत्र | गुण |
| 1 | MSCIT किंवा समतुल्य प्रमाणपत्र (CCC) सायबर सुरक्षा यांचे ज्ञान असल्याबाबत प्रमाणपत्र | 15 |
- पायाभूत सुविधा (15 गुण) (सर्व पायाभूत सुविधा असणे आवश्यक)
प्रत्यक्ष तपासणी पथकामार्फत खालील पायाभूत सुविधाबाबत तपासणी करण्यात येईल.
| अ.क्र. | सुविधा | गुण |
| 1 | किमान 100 चौ. फूट कार्यालय | 15 |
| 2 | दोन संगणक / लॅपटॉप | |
| 3 | लेझर प्रिंटर | |
| 4 | स्कॅनर | |
| 5 | बायोमेट्रिक उपकरण | |
| 6 | वेबकॅम | |
| 7 | UPS/वीज बँक अप | |
| 8 | ब्रॉडबैंड इंटरनेट (ग्रामीण 10 mbps नागरी 20 mbps) | |
| 9 | CCTV | |
| 10 | नागरिकांसाठी प्रतीक्षा व्यवस्था व सूचना फलक | |
| 11 | शासनप्राधिकृत सेवा शुल्क दर्शविणारा फलक व बाह्य नामफलक |
- आर्थिक क्षमता (10 गुण) (अपलोड करावे)
| अ.क्र. | पुरावा | गुण |
| 1 | बैंक स्टेटमेंट, आयकर विवरणपत्र, आर्थिक शाश्वततेचे स्वयंघोषणापत्र इ.पैकी | 10
|
- ग्राहक सेवा व संवाद कौशल्य (खालील निकषानुसार मुलाखतीद्वारे गुण देण्यात येतील.) (20 गुण)
| अ.क्र. | निकष | गुण |
| 1 | शासकीय सेवांचे ज्ञान, नागरिकाभिमुख सेवावृत्ती, डिजीटल प्रणाली हाताळण्याची क्षमता, समस्या सोडविण्याची क्षमता, संवाद कौशल्य, प्रामाणिकपणा व नैतीकता, माहिती गोपनियता व डेटा सुरक्षा याबाबत जागरुकता | 20 |
- अनुभव (10 गुण) (प्रमाणपत्र अपलोड करावे)
| अ.क्र. | अनुभव | गुण |
| 1 | CSC ऑपरेटर, महा-ई-सेवा केंद्र बँकिंग प्रतिनिधी (BC), ई-गव्हर्नन्स प्रकल्प, शासकीय सेवा केंद्र/कराराचा अनुभव | 10 |
- व्यवसाय आराखडा (5 गुण) (फॉर्म भरतेवेळी खालीलपैकी अपलोड करावा)
| अ.क्र. | निकष | गुण |
| 1 | सेवा विस्तार, जनजागृती, आर्थिक व्यवहार्यता, व्यवसाय नियोजन | 5 |
- सामाजिक समावेशकता कोणतेही 1असल्यास (5 गुण) (आवश्यक प्रमाणपत्र अपलोड करावे)
| अ.क्र. | निकष | गुण |
| 1 | महिला, माजी सैनिक, दिव्यांग, स्वयं-सहाय्यता बचत गट सदस्य/स्थानिक उद्योजक | 5 |
- चारित्र्य पडताळणी (10 गुण) (फॉर्म भरतेवेळी सदर प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक )
| अ.क्र. | निकष | गुण |
| 1 | पोलीस पडताळणी, फौजदारी दोषसिद्धी नसणे
आर्थिक फसवणुकीचा इतिहास नसणे ‘शासकीय काळ्या यादीत (Blacklisted) नसणे |
10 |
भाग -3 : “आपले सरकार सेवा केंद्र” मिळणेकामीच्या सर्वसाधारण अटी व शर्ती
| 1 | रिक्त असलेल्या शहरी भागातील 18 आणि ग्रामीण भागातील 203 असे एकुण 221 सेतु केंद्रांकरीता जाहीरात प्रसिध्द करण्यात येत आहे. |
| 2 | महाराष्ट्र शासनाने प्रसिध्द केलेल्या आपले सरकार सेवा केंद्राबाबतचे शासन निर्णय दिनांक 19 जानेवारी 2018, दिनांक 27 मार्च 2025 व दिनांक: 09 जुलै, 2026 च्या शासन निर्णयाला अधिन राहुन केंद्राची नियुक्ती व कार्यान्वित केल्या जाईल. तसेच वरीलप्रमाणे शासन निर्णय व शासन शुद्धीपत्रकामधील अटी व शर्तीचे पालन करणे अर्जदारास अनिवार्य राहील. त्याचा भंग केल्यास कोणतीही पुर्वसुचना न देता केंद्र बंद करण्यात येईल. |
| 3 | उमेदवार हा गुंतवणूकीचे दृष्टीकोनातून सक्षम असावा, आवश्यक गुंतवणूक करण्याची व किमान 6 ते 12 महिने व्यवसाय चालविण्याची आर्थिक क्षमता असावी. |
| 4 | अर्जदाराकडे स्वतःचे/Rented किमान 100 चौ. फुटाचे स्वतंत्र कार्यालय, दोन संगणक लॅपटॉप, प्रिंटर, स्कॅनर, बायोमेट्रिक उपकरण, इंटरनेट, बीज बॅकअप, सीसीटीव्ही, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी सुलभ प्रवेश सुविधा असणे आवश्यक आहे. |
| 5 | शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार केंद्र चालू ठेवणे, शासनाने ठरवून दिलेले दरपत्रक केंद्रावर दर्शनी भागात प्रसिध्द करणे, तसेच ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक शुल्काची आकारणी न करणे, शासनाने पुरविलेल्या आज्ञावलीचा (software) इ. योग्य वापर, संरक्षण, व जतन करणे अर्जदारांना बंधनकारक राहील. तसेच नागरीकांसाठी बसण्याची सोय तथा आवश्यक सर्व बाबींची पूर्तता करावी लागेल. याबाबत नागरीकांकडून तक्रारी प्राप्त झाल्यास, सदर विषयी उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांचेमार्फत गंभीर दखल घेण्यात येईल व चौकशी करून कारवाई करण्यात येईल. |
| 6 | आपले सरकार सेवा केंद्राना शासनाने तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाने तसेच उपविभागीय अधिकारी व तहसिलदार व इतर कार्यालय प्रमुख यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशांचे/निर्देशांचे पालन करावे लागेल. तसेच त्यांनी केंद्राबाबत मागीतलेले अहवाल तात्काळ सादर करावे लागतील. |
| 7 | निर्गत केलेल्या दाखल्याच्या / प्रमाणपत्राच्या स्थळप्रती संबंधित उपविभागीय अधिकारी / तहसिल कार्यालयात जमा करणे बंधनकारक राहील. |
| 8 | महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ यांनी नियुक्त केलेले तांत्रीक अधिकारी हे आपले सरकार सेवा केंद्राची संपुर्ण चौकशी करू शकतील. |
| 9 | मुलाखतीसाठी पात्र अर्जदारांचे जाहीरातीनुसार आवश्यक पात्रता व अर्जात भरलेली माहिती यांच्या आधारे मुळ कागदपत्रे पडताळणी करण्यात येईल. ज्या अर्जदाराची जाहीरातीनुसार आवश्यक पात्रता व अर्जात भरलेली माहिती, शुल्क कागदपत्रांच्या आधारे परिपूर्ण सिध्द होईल अशाच अर्जदाराचा विचार आपले सरकार सेवा केंद्र वाटपाच्या प्रक्रियेच्या पुढील टप्याकरीता करण्यात येईल. त्याप्रमाणे अंतरीम स्वरुपात यादी जाहीर करण्यात येईल. सादर केलेली कागदपत्रे यामध्ये तफावत आढळल्यास अर्जदाराची उमेदवारी नविन आपले सरकार सेवा केंद्र वाटपाच्या कुठल्याही टप्प्यावर रद्द होवू शकेल. |
| 10 | केंद्र व राज्य शासनाचे शासकीय / निमशासकीय / सार्वजनिक उपक्रमे/महामंडळे स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच ई. तसेच शासकीय सेवांमध्ये कार्यरत असणा-या अधिकारी/कर्मचारी यांना आपले सरकार सेवा केंद्राकरिता अर्ज करता येणार नाही. (आपले सस्कार सेवा केंद्रा करिता अर्ज प्रक्रियेत ग्रामपंचायत मधील रुजु असलेले केंद्र चालक या प्रक्रियेसाठी अपात्र असतील.) |
| 11 | अंतिम पात्र झालेल्या उमेदवारांना सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर केंद्र एक महिन्यात सुरु करून, अहवाल सेतु समिती कार्यालयास सादर करणे बंधनकारक राहील. (शासन नियमानुसार केंद्र स्थापन केल्याबाबत जि.पी.एस. एर्नेबल्ड फोटो सादर करणे बंधनकारक आहे.) |
| 12 | आपले सरकार सेवा केंद्र वाटपाबाबत मा.जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा सेतु समिती, वाशिम यांनी घेतलेला निर्णय अंतिम राहील. याबाबत भविष्यात कोणत्याही प्रकारचा दावा करता येणार नाही. |
| 13 | वाशिम जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्रांच्या जाहिरातीबाबत सर्व माहिती वेळोवेळी जिल्हयाचे संकेतस्थळावर https://washim.gov.in उपलब्ध करुन देण्यात येईल. त्याकरीता या कार्यालयाशी संपर्क साधण्याची आवश्यकता नाही. |
| 14 | प्राप्त अर्जापैकी कोणता अर्ज स्वीकारायचा, कोणता अर्ज नाकारायचा किंवा संपूर्ण प्रक्रिया कोणतेही कारण न देता रद्द करणेचे अधिकार मा.जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा सेतु समिती, वाशिम यांचेकडे राखून ठेवण्यात आले आहे. |
| 15 | अर्जदारास मंजुर करण्यात आलेल्या संबधित प्रभाग/गावामध्ये आपले सरकार सेवा केंद्र चालविणे बंधनकारक असेल. मंजुर करण्यात आलेल्या ठिकाणी केंद्र चालवित नसल्यास अथवा दुस-या ठिकाणी चालवित असल्याचे आढळून आल्यास कोणतीही पुर्व सुचना न देता केंद्र कायमस्वरूपी बंद करण्यात येईल. |
| 16 | अर्जदारास आपले सरकार सेवा केंद्र मंजुर झाल्यानंतर अर्जदारांनी 03 महिन्याच्या कालावधीमध्ये एकही व्यवहार न केल्यास त्यांना मंजुर करण्यात आलेले केंद्र रद्द करण्यात येईल. त्यानंतर पुन्हा केंद्र चालु करण्यात येणार नाही. अनिवार्य प्रशिक्षण व 6 महिन्यांचा परिविक्षाधिन कालावधी समाधानकारक कार्यप्रदर्शनानंतर नियमित मान्यता देण्यात येईल. त्यानंतर प्रारंभी 3 वर्षाकरीता नविन आपले सरकार सेवा केंद्र वाटपाचा आदेश पारीत करण्यात येईल. तसेच पुढील नुतनीकरण कार्यप्रदर्शनावर आधारित शासन शुधिपत्रकातील निकषांचा आधारे करण्यात येईल. |
| 17 | अर्जदारास कोणत्याही प्रक्रियेबाबत वैयक्तीक पत्रव्यवहार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. |
| 18 | अर्ज भरते वेळेस प्रत्येक अपलोडीग कागदपत्रांना स्वत:चे पुर्ण नाव व कागदपत्राचे नाव देणे आवश्यक आहे. |
| 19 | अर्जदारास फक्त एकच आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करु शकतील. एका कुटुंबातुन दोन अर्ज आल्यास दोन्ही अर्ज ग्राहय धरण्यात येणार नाही. तसेच उमेदवाराच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीकडे यापुर्वी आपले सरकार सेवा केंद्र असेल त्याचा अर्ज ग्राहय धरल्या जाणार नाही. |
भाग – 4 : ऑनलाईन (Online) अर्ज करण्याची पध्दत :-
| 1 | Online अर्ज करणे प्रक्रीयेची थोडक्यात पद्धती खालील प्रमाणे आहे. (विस्तृत माहितीसाठी संकेतस्थळावरील “आपले सरकार सेवा केंद्राकरीता अर्ज भरणे” पहावे.) |
| 2 | प्रस्तुत आपले सरकार सेवा केंद्र वाटपाकरीता फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्विकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्विकारण्यात येणार नाही. |
| 3 | उमेदवाराला ऑनलाईन अर्ज https://washim.gov.in या संकेतस्थळावर सादर करणे आवश्यक राहील. ऑनलाईन अर्ज स्विकारण्याच्या अंतिम दिनांकानंतर संकेतस्थळावरील अर्ज भरण्याची लिंक बंद केली जाईल. |
| 4 | अर्जदार यांनी सदर संकेतस्थळावर प्रथम लॉगिन आयडी व पासवर्ड तयार करुन जतन करुन ठेवावा. अर्जदार यांनी फॉर्म भरताना गावाचे नाव, विस्तृत जाहिरातीत सदर गावात आपले सरकार सेवा केंद्र स्थापना करण्याकरीता सदर गावाचे नाव समाविष्ट आहे काय? याची खात्री करून अर्ज भरावे, अर्ज नाकारल्या गेल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत उमेदवाराची राहील.
|
| 5 | प्रत्यक्ष अर्ज भरण्यापूर्वी विस्तृत जाहिरातीचे वाचन करुन त्यातील अटी व शर्ती पडताळून पहाव्यात. सदर विस्तृत जाहिरात https://washim.gov.in वर उपलब्ध आहे. |
| 6 | https://washim.gov.in या संकेतस्थळावर “आपले सरकार सेवा केंद्राकरीता अर्ज भरणे” येथे click करावे. यानंतर जाहीरातील संपुर्ण online अर्ज करणे प्रक्रीयेची माहिती दिसेल.
|
| 7 | यानंतर सर्व रकान्यामध्ये आपली माहिती व्यवस्थित भरावी. |
| 8 | पूनर्विलोकनात (Review) सर्व माहिती बरोबर असल्यास Save and Continue वर click करावे. |
| 9 | अर्जदार यांना ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत काही अडचणी असल्यास त्यांनी Helpdesk No.9922899941श्री.सुनिल घोडे, सहा.अधिक्षक, जि.का.वाशिम व No.9850794228 श्री किरण सोळंके, नेटवर्क सॉफ्टवेअर अभियंता, जि.का.वाशिम यांचेशी संपर्क साधुन अधिक माहिती प्राप्त करुन घ्यावी. |
| 10 | यामूळे अर्जदाराने भरलेली माहिती संकेतस्थळावर Save होईल. |
| 11 | यानंतर उमेदवार आपले सरकार सेवा केंद्र वाटपाच्या प्रक्रियेकरीता प्रक्रीया शुल्क रू.500/- (ना परतावा) ऑनलाईन पध्दतीने Upi- Phonepe, Gpay Etc. इत्यादीव्दारे Qr Code स्कॅन करुन भरावे. |
| 12 | ऑनलाईन प्रक्रिया शुल्क भरल्यानंतर उमेदवारास अर्जाची Print काढता येईल. तसेच अर्जदारांनी ई-मेलवरील भरलेल्या अर्जाची प्रिंट काढुन त्यावर स्वाक्षरी करुन अर्जात नमुद केलेल्या संबधित माहितीच्या कागदपत्राचा संच जोडून त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी संबंधित तहसिल कार्यालयामध्ये सादर करावा. |
| 13 | उमेदवाराने भरलेल्या माहिती आधारे व शासन निर्णय दि.09 जूलै 2026 चे मधील गुणांकनानुसार त्यास मुलाखतीकरीता पात्र करण्यात येईल. तेव्हा अर्जदाराने Online अर्ज भरताना त्यांच्या पात्रतेनुसार अचूक, परिपुर्ण व खरी माहिती भरावी.
|
| 14 | Online अर्जासोबत कोणेतही अनावश्यक प्रमाणपत्रे अथवा कागदपत्रे जोडू (Upload) नयेत. |
| 15 | उमेदवाराची ऑनलाईन अर्जात (जाहिरातीमध्ये नमुद केलेल्या पात्रतेनुसार) कागदपत्रे (Upload) केलेली आहे असे गृहित धरून पुर्वतपासणी / छाननी न करता गुणांकन केले जाणार असल्यामुळे, पात्र उमेदवाराला मिळालेल्या गुणांच्या आधारे, उमेदवाराला आपले सरकार सेवा केंद्र मंजूर झाल्याबाबत कोणतेही हक्क सांगता येणार नाही, उमेदवाराने ऑनलाईन अर्जात नमुद केलेल्या गृहीत पात्रतेनुसार अंतरीम यादी प्रसिध्द करुन, मुळ कागदपत्रांच्या पूर्ण छाननीनंतरच उमेदवाराची पात्रता निश्चित करण्यात येईल. व तदनंतरच उमेदवारास प्रत्यक्ष मुलाखतीस पात्र करण्यात येईल. पात्रता धारण न करणा-या उमेदवारास आपले सरकार सेवा केंद्र वाटपाच्या कोणत्याही टप्यावर अपात्र करण्याचे अधिकार अध्यक्ष, जिल्हास्तरीय सेतु समितीकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत व याबाबत उमेदवारास कोणतीही तक्रार करता येणार नाही. |
| 16 | उमेदवाराचे ऑनलाईन अर्ज भरतेवेळी जोडलेल्या (Upload) केलेल्या कागदपत्राच्या आधारे (तात्पुरत्या गुणांकनाच्या आधारे) उमेदवारास मुलाखतीस पात्र/अपात्र करण्यात येईल. मुलाखतीस पात्र उमेदवारास मुलाखतीसाठी मुळ कागदपत्रासह उपस्थित राहाणे अनिवार्य राहील. अनुपस्थित राहिल्यास संबंधिताची उमेदवारी संपुष्टात येईल. |
| 17 | ऑनलाईन पध्दतीने अर्ज अपुर्णतेमुळे नाकारला गेल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत उमेदवाराची राहील व याबाबत उमेदवारास कोणत्याही प्रकारची तक्रार करता येणार नाही. तसेच ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती बदलता येणार नाही. |
| 18 | प्रस्तुत प्रक्रीया ही Online पध्दतीने असल्याने उमेदवाराने माहिती भरताना अचुक / खरी / जी कागदपत्रे / प्रमाणपत्रे उपलब्ध आहेत, अशीच माहिती भरावी. चुकीची / खोटी / दिशाभूल करणारी / अन्य इसमाची अथवा नंतर उशीराने कागदपत्रे /प्रमाणपत्रे उपलब्ध होणारी माहिती भरल्यास व भविष्यात निदर्शनास आल्यास अथवा अशा उमेदवाराची निवड झाल्यास त्यांची निवड रद्द करण्यात येईल व शासनाची फसवणुक केल्या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, यांची संबंधीतांनी गांभिर्यपुर्वक नोंद घ्यावी. |
| 19 | उमेदवाराने आपले सरकार सेवा केंद्र वाटपासंदर्भात कोणत्याही प्रकारची शिफारस अथवा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास त्याची उमेदवारी अपात्र ठरविण्यात येईल. तसेच आपले सरकार सेवा केंद्र वाटप प्रक्रियेसंदर्भात अनूचित अथवा बेकायदेशीर कृत्य केल्यास संबंधितावर फौजदारी कारवाई करण्यात येईल. |
| 20 | अर्ज केला अथवा विहित अर्हता धारण केली म्हणजे नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला आहे असे असणार नाही. |
| 21 | आपले सरकार सेवा केंद्र वाटपानुषंगाने वेळोवेळी शासनाकडून प्राप्त होणाऱ्या सूचनाप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल व त्या अटी जशास तशा लागू राहतील. |
भाग – 5 : अर्ज तपासणीचे विविध टप्पे
| 1 | अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्राच्या आधारे प्राथमिक छाननी करून पात्र/अपात्र ची स्थिती https://washim.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. |
| 2 | पायाभूत सुविधांचे अनुषंगाने, प्रस्तावित कार्यालयाची प्रत्यक्ष पाहणी, तपासणी पथकाद्वारे करण्यात येईल. (तपासणी बाबतचे वेळापत्रक स्वतंत्रपणे प्रसिध्द करण्यात येईल.) |
| 3 | पायाभूत सुविधांचे अनुषंगाने तपासणी झाल्यानंतर पात्र/अपात्र यादी तसेच मुलाखतीचे व मुळ कागदपत्र तपासणी बाबतचे वेळापत्रक https://washim.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. |
| 4 | जिल्हास्तरीय निवड समितीमार्फत संरचित मुलाखत पुर्ण झाल्यावर, 100 गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी (Merit List) https://washim.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. |
| 5 | प्राथमिक निवड यादी प्रसिद्ध झाल्यानंतर हरकती मागविण्यात येईल. याबाबत वेळापत्रक https://washim.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. |
| 6 | प्राथमिक निवड यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्राप्त हरकतींवर निर्णय घेवून अंतिम निवड यादी https://washim.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. |
भाग – 6 : आपले सरकार सेवा केंद्र जाहिरात-2026
नवीन आपले सरकार सेवा केंद्र मिळणेकामी ऑनलाईन अर्ज सादर करतांना सर्व कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
| 1 | अर्जदाराचे वय किमान 18 वर्ष पूर्ण असावे. (टि.सी.ची प्रत अपलोड करावी) |
| 2 | शैक्षणिक पात्रता किमान उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (HSC) उत्तीर्ण असावा. (बारावी, पदवी, पदव्युत्तर चे गुणपत्रक/प्रमाणपत्र सोबत जोडावे.) |
| 3 | आधार कार्ड, पॅनकार्ड, बँक खाते (मागील 6 महिन्याचे स्टेटमेंट) इ. कागदपत्र अपलोड करावे. |
| 4 | सेतु पाहीजे असलेल्या प्रभाग/गावाचे नाव नमुद करावे. |
| 5 | जागेच्या मालकी हक्काची कागदपत्रे (घर कर पावती चालु वर्षाची, इलेक्ट्रीक बिल, मालमत्ता पत्रक, मतदान कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, पासपोर्ट, बँकेचे खाते पुस्तक, अथवा रेशन कार्ड ग्रामपंचायतीचा न.न.8) घर स्वतःचे नसल्यास घरमालकाचे भाडेतत्वावरची कागदपत्रे (भाडेपत्रक व घरमालकाचे चालु वर्षाची घरकर पावती) |
| 6 | संगणकाचे मूलभूत ज्ञान आवश्यक राहील. MSCIT किंवा समतुल्य प्रमाणपत्र. (प्रमाणपत्र अपलोड करणे) |
| 7 | पायाभूत सुविधेतील पुर्तता केल्याचे कागदपत्रे /फोटो (अपलोड करावे) |
| 8 | संगणक हाताळणी, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, सायबर सुरक्षा यांचे ज्ञान असल्यास प्रमाणपत्र अपलोड करा. |
| 9 | शासनाच्या धोरणानुसार दिव्यांग, माजी सैनिक, महिला, स्वयंसहाय्यता गट सदस्य किंवा स्थानिक उद्योजकांनी असल्यास प्रमाणपत्र अपलोड करावे |
| 10 | आर्थिक क्षमतेचा पुरावा अपलोड करावे. |
| 11 | CSC, महा-ई-सेवा केंद्र, इन्शुरन्स बँकिंग प्रतिनिधी, ई-गव्हर्नन्स किंवा तत्सम क्षेत्रातील अनुभव असल्यास प्रमाणपत्र अपलोड करावे. |
| 12 | अर्जदारांनी अर्ज शुल्क रक्कम रू.500/- (ना परतावा) जाहिरातीमधील क्यु.आर. कोडवर जमा करून अर्ज शुल्क भरणा केल्याची पावती व UTR No अर्जामध्ये अपलोड करावे. |
| 13 | अर्जदारांनी सर्व कागदपत्र ऑनलाईनने अपलोड करणे बंधनकारक राहील तसेच मेलवरील भरलेल्या अर्जाची प्रिंट काढुन स्वंयघोषणापत्रसहीत सर्व कागदपत्राचा संच संबंधित तहसिल कार्यालयामध्ये त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी सादर करावे. मुदतीनंतर अर्जदाराकडून कुठलेही कागदपत्र स्विकारले जाणार नाहीत. |
| 14 | पोलीस पडताळणी, फसवणूक, आर्थिक गैरव्यवहार किवा शासकीय काळ्या यादीत नसणे, संबंधित पोलीस स्टेशनचे चालू महिन्याचे चारीत्र्य प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे अनिवार्य आहे. (चारीत्र्य प्रमाणपत्र नसेल तर चारीत्र्य प्रमाणपत्रासाठी सादर केलेल्या अर्जाची पोच पावती जोडावी) |
| वाशिम तालुका– ग्रामपंचायत माहिती | ||||||
| S.NO | ग्रामपंचायत | समाविष्ट गावे | सन २०११ च्या जणगणनेनुसार लोकसंख्या | शासन निर्णय मधील मापदंडानुसार अनुज्ञेय केंद्राची संख्या | सेतू केंद्र संख्या | रिक्त सेतू संख्या |
| 1 | अडगाव खु. | अडगाव खु. | 1157 | 2 | 1 | 1 |
| 2 | बाभुळगाव | बाभुळगाव | 1942 | 2 | 1 | 1 |
| 3 | भौयता | भौयता | 803 | 2 | 1 | 1 |
| 4 | देवठाणा (बु.) | देवठाणा (बु.) | 1045 | 2 | 1 | 1 |
| 5 | देपूळ | देपूळ | 1864 | 2 | 0 | 2 |
| 6 | ढिल्ली | ढिल्ली | 844 | 2 | 1 | 1 |
| निंबलवाडी | 292 | |||||
| 7 | फाळेगाव (थेट) | फाळेगाव (थेट) | 1642 | 2 | 1 | 1 |
| 8 | घोटा | घोटा | 1160 | 2 | 0 | 2 |
| 9 | गोंडेगाव | गोंडेगाव | 1346 | 2 | 1 | 1 |
| 10 | हिवरा रोहिला | हिवरा रोहिला | 2061 | 2 | 0 | 2 |
| 11 | इलखी | इलखी | 1153 | 2 | 1 | 1 |
| 12 | जुमडा | जुमडा | 952 | 2 | 1 | 1 |
| कुंभारवाडी | 162 | |||||
| अटकळी | 547 | |||||
| 13 | काजळांबा | काजळांबा | 2357 | 2 | 1 | 1 |
| 14 | कार्ली | कार्ली | 2140 | 2 | 1 | 1 |
| 15 | काटा | काटा | 4199 | 2 | 1 | 1 |
| 16 | खरोळा | खरोळा | 1419 | 2 | 1 | 1 |
| 17 | कोंडाळा (झामरे) | कोंडाळा (झामरे) | 2482 | 2 | 1 | 1 |
| 18 | कृष्णा | कृष्णा | 2056 | 2 | 1 | 1 |
| पांगरखेड | 405 | |||||
| 19 | मोहजा रोड | मोहजा रोड | 1504 | 2 | 1 | 1 |
| 20 | पार्डी आसरा | पार्डी आसरा | 1752 | 2 | 1 | 1 |
| 21 | पिंपळगाव | पिंपळगाव | 2518 | 2 | 0 | 2 |
| खडसिंगी | 525 | |||||
| 22 | सावळी | सावळी | 1295 | 2 | 1 | 1 |
| 23 | शेलू (बु.) | शेलू (बु.) | 1218 | 2 | 1 | 1 |
| 40840 | 46 | 19 | 27 | |||
| अ.क्र. | तालुका | रिक्त प्रभाग क्रमांक | वार्ड क्र. मध्ये समाविष्ट एरियाचे नाव/ चौक/ एरिया | सन 2011 च्या जणगणनेनुसार लोकसंख्या | शासन निर्णय मधील मापदंडानुसार अनुज्ञेय केंद्राची संख्या | कार्यरत सेतू संख्या | रिक्त सेतूची संख्या |
| 1 | वाशिम | 4 | कृषी उत्पन बाजार समिती पंचशील नगर, कोठेकर वाडी, रेल्वे स्टेशन परिसर, हिंगोली नाका परिसर | 5346 | 2 | 1 | 1 |
| 7 | अल्लाडा प्लॉट / मंत्री पार्क ड्रीमलैंड सिटी, रिद्धी सिद्धी अपार्टमेंट परिसर, बाकलीवाल कॉलनी, निरंकारी भवन,खामगाव जिन रोड | 5171 | 2 | 1 | 1 | ||
| 10 | शंकर बाबा मंदिर/ जिजाऊ नगर बालाजी देवस्थान परिसर, नप शिवाची शाळा परिसर पैलवान शहा विहीर | 5110 | 2 | 1 | 1 | ||
| 14 | भारत फंक्शन हॉल, मुस्लिम दफनभूमी, अण्णाभाऊ साठे समाज मंदिर, मन्नासिंह चौक, जुना गुरांचा दवाखाना परिसर, हकीमजली नगर | 5145 | 2 | 1 | 1 | ||
| 15 | गुप्ता लेआउट शादिखाना कसाबपुरा | 5386 | 2 | 1 | 1 |
| मालेगाव तालुका– ग्रामपंचायत माहिती | ||||||
| अ.क्र. | ग्रामपंचायतीचे नांव | समाविष्ट गावे | लोकसंख्या (2011 जनगणनानुसार) | शासन निर्णय मधील मापदंडानुसार अनुज्ञेय केंद्राची संख्या | सेतू केंद्र संख्या | रिक्त सेतू संख्या |
| 1 | डही | डही | 1559 | 2 | 1 | 1 |
| 2 | कळंबेश्वर | कळंबेश्वर | 1896 | 2 | 1 | 1 |
| 3 | सोनाळा | सोनाळा | 1075 | 2 | 1 | 1 |
| वाकापूर | 319 | |||||
| 4 | मारसुळ | मारसुळ | 1660 | 2 | 1 | 1 |
| 5 | झोडगा बु. | झोडगा बु. | 684 | 2 | 1 | 1 |
| झोडगा खु. | 326 | |||||
| जांभरुण वाडी | 532 | |||||
| 6 | किन्हीघोडमोड | किन्हीघोडमोड | 879 | 2 | 1 | 1 |
| मिर्झापूर | 672 | |||||
| जामठी उ | 0 | |||||
| 7 | खडकी इजारा | खडकी इजारा | 1212 | 2 | 0 | 2 |
| 8 | जोडगव्हाण | जोडगव्हाण | 1201 | 2 | 0 | 2 |
| रामनगर | 813 | |||||
| 9 | शिरसाळा | शिरसाळा | 1400 | 2 | 1 | 1 |
| 10 | अमानी | अमानी | 2999 | 2 | 1 | 1 |
| 11 | बोर्डी | बोर्डी | 410 | 2 | 1 | 1 |
| कोल्ही | 354 | |||||
| 12 | तिवळी | तिवळी | 3459 | 2 | 1 | 1 |
| साक्रापूर | 114 | |||||
| 13 | खंडाळा शिंदे | खंडाळा शिंदे | 1421 | 2 | 1 | 1 |
| 14 | मैराळडोह | मैराळडोह | 2180 | 2 | 1 | 1 |
| 15 | वडप | वडप | 1173 | 2 | 1 | 1 |
| 16 | वाडीरामराव | वाडीरामराव | 453 | 2 | 0 | 2 |
| पिंपळशेंडा | 662 | |||||
| 17 | पांगरी नवघरे | पांगरी नवघरे | 2925 | 2 | 1 | 1 |
| 18 | भेरा | भेरा | 1035 | 2 | 1 | 1 |
| 19 | खिर्डा | खिर्डा | 1744 | 2 | 1 | 1 |
| 20 | एकांबा | एकांबा | 2375 | 2 | 1 | 1 |
| मानका | 333 | |||||
| 21 | सोमठाणा | सोमठाणा | 926 | 2 | 1 | 1 |
| दापूरी कालवे | 646 | |||||
| ताकतोडा | 682 | |||||
| 22 | कोठा | कोठा | 1169 | 2 | 1 | 1 |
| 23 | माळेगांव न.की. | माळेगांव न.की. | 1109 | 2 | 1 | 1 |
| धरमवाडी | 608 | |||||
| 24 | भौरद | भौरद | 1207 | 2 | 1 | 1 |
| भिलदु्र्ग | 401 | |||||
| 25 | वरदरी बु. | वरदरी बु. | 1110 | 2 | 1 | 1 |
| 26 | कुत्तरडोह | कुत्तरडोह | 960 | 2 | 1 | 1 |
| 27 | कोळदरा | कोळदरा | 701 | 2 | 1 | 1 |
| 28 | उमरवाडी | उमरवाडी | 770 | 2 | 1 | 1 |
| 46154 | 56 | 25 | 31 | |||
| अ.क्र. | तालुका | रिक्त प्रभाग क्रमांक | वार्ड क्र. मध्ये समाविष्ट एरियाचे नाव/ चौक/ एरिया | सन 2011 च्या जणगणनेनुसार लोकसंख्या | शासन निर्णय मधील मापदंडानुसार अनुज्ञेय केंद्राची संख्या | कार्यरत सेतू संख्या | रिक्त सेतूची संख्या |
| 1 | मालेगाव | 3 | बोरगाव रोड,गांधी नगर,तहसिल चा मागील भाग | 1136 | 1 | 0 | 1 |
| 7 | नगरपंचायत समोरील रस्ता,आठवडी बाजार परिसर,मालनेश्वर मंदिर,रोहिदासपुरा | 1275 | 1 | 0 | 1 | ||
| 12 | तेली वेटाळ,जैन गल्ली | 1377 | 1 | 0 | 1 | ||
| 14 | दुर्गा चौक गुप्ता गल्ली,कुटे वेटाळ | 1336 | 1 | 0 | 1 | ||
| 16 | गाडगे नगर,अंकल नगर,अकोला फाटा | 1249 | 1 | 0 | 1 |
| रिसोड तालुका– ग्रामपंचायत माहिती | ||||||
| अ.क्र. | ग्रामपंचायतीचे नांव | समाविष्ट गावे | सन २०११ च्या जणगणनेनुसार लोकसंख्या | शासन निर्णय मधील मापदंडानुसार अनुज्ञेय केंद्राची संख्या | सेतू केंद्र संख्या | रिक्त सेतू संख्या |
| 1 | आगरवाडी | आगरवाडी | 1526 | 2 | 1 | 1 |
| 2 | आसेगाव | आसेगाव | 2146 | 2 | 1 | 1 |
| 3 | बिबखेड | बिबखेड | 1473 | 2 | 1 | 1 |
| 4 | देगाव | देगाव | 944 | 2 | 1 | 1 |
| 5 | धोडप (बु.) | धोडप (बु.) | 2246 | 2 | 0 | 2 |
| 6 | एकलासपुर | एकलासपुर | 2119 | 2 | 1 | 1 |
| 7 | गौंढळा | गौंढळा | 1248 | 2 | 1 | 1 |
| नागझरी | 611 | |||||
| उकिरखेड | 329 | |||||
| 8 | जाब अढाव | जाब अढाव | 1406 | 2 | 1 | 1 |
| 9 | करंजी | करंजी | 971 | 2 | 1 | 1 |
| 10 | केशवनगर | केशवनगर | 1074 | 2 | 1 | 1 |
| 11 | कोयाळी बु. (के) | कोयाळी बु. (के) | 1648 | 2 | 1 | 1 |
| कोयाळी खु. | 823 | |||||
| 12 | कोयाळी (खु) आर | कोयाळी (खु) आर | 647 | 2 | 1 | 1 |
| वरुड तोफा | 670 | |||||
| 13 | कुक्सा | कुक्सा | 930 | 2 | 1 | 1 |
| गणेशपुर | 695 | |||||
| 14 | महागाव | महागाव | 2605 | 2 | 1 | 1 |
| 15 | मांडवा | मांडवा | 2028 | 2 | 1 | 1 |
| 16 | मांगुळझनक | मांगुळझनक | 2873 | 2 | 1 | 1 |
| 17 | नावली | नावली | 1811 | 2 | 1 | 1 |
| 18 | पार्डी तीखे | पार्डी तीखे | 1100 | 2 | 1 | 1 |
| खडकी ढंगारे | 539 | |||||
| 19 | पेनबोरी | पेनबोरी | 2006 | 2 | 1 | 1 |
| 20 | वडजी | वडजी | 1345 | 2 | 0 | 2 |
| Total | 35813 | 40 | 18 | 22 | ||
| मंगरुळपीर तालुका– ग्रामपंचायत माहिती | ||||||
| अ.क्र. | ग्रामपंचायतीचे नाव | समाविष्ट गावे | एकुण लोकसंख्या | शासन निर्णय मधील मापदंडानुसार अनुज्ञेय केंद्राची संख्या | एकुण सेतू कार्यरत संख्या | रिक्त सेतू संख्या |
| 1 | शिवणी रोड | शिवणी रोड | 1108 | 2 | 1 | 1 |
| चकवा | 446 | |||||
| उमरडोह उजाड | 0 | |||||
| बहादरपुर उजाड | 0 | |||||
| 2 | पोटी | पोटी | 1260 | 2 | 1 | 1 |
| पिंपळशेंडा उजाड | 0 | |||||
| नवखी उजाड | 0 | |||||
| 3 | मसोला बु | मसोला बु | 907 | 2 | 1 | 1 |
| 4 | मंगळसा | मंगळसा | 1049 | 2 | 1 | 1 |
| वाडा | 266 | |||||
| झाडगाव | 347 | |||||
| मुर्तीजापुर | 1042 | |||||
| पिंपळगाव उजाड | 0 | |||||
| 5 | बेलखेड | बेलखेड | 963 | 2 | 1 | 1 |
| ईस्माइलपुर उजाड | 0 | |||||
| दिलावरपुर उजाड | 0 | |||||
| 6 | जनुना बु. | जनुना बु. | 972 | 2 | 0 | 2 |
| 7 | कोठारी | कोठारी | 2325 | 2 | 1 | 1 |
| धर्मापुर उजाड | 0 | |||||
| 8 | लावणा | लावणा | 971 | 2 | 1 | 1 |
| सावळापुर उजाड | 0 | |||||
| रेणकापुर | 7 | |||||
| पेठखुदावतपुर | 6 | |||||
| 9 | बोरव्हा खु | बोरव्हा खु | 1359 | 2 | 0 | 2 |
| 10 | जोगलदरी | जोगलदरी | 1378 | 2 | 0 | 2 |
| जुनापाणी उजाड | 0 | |||||
| 11 | चिखलागड | चिखलागड | 1100 | 2 | 1 | 1 |
| 12 | शेगी | शेगी | 1773 | 2 | 1 | 1 |
| 13 | शेंदुरजना मोरे | शेंदुरजना मोरे | 1872 | 2 | 1 | 1 |
| मजलापुर | 128 | |||||
| 14 | तपोवन | तपोवन | 1062 | 2 | 1 | 1 |
| पांगरी महादेव | 702 | |||||
| 15 | येडशी | येडशी | 1748 | 2 | 0 | 2 |
| 16 | माळशेलु | माळशेलु | 1809 | 2 | 1 | 1 |
| 17 | भुर | भुर | 842 | 2 | 0 | 2 |
| पुर | 82 | |||||
| रुई | 38 | |||||
| तांदळी | 512 | |||||
| 18 | कंझरा | कंझरा | 2135 | 2 | 1 | 1 |
| 19 | चिखली | चिखली | 1481 | 2 | 0 | 2 |
| 20 | हिरंगी | हिरंगी | 984 | 2 | 1 | 1 |
| खेर्डा बु. | 62 | |||||
| खेर्डा खु | 157 | |||||
| 21 | गोगरी | गोगरी | 2180 | 2 | 1 | 1 |
| 22 | चोरद | चोरद | 1106 | 2 | 1 | 1 |
| जनुना खु. | 275 | |||||
| 23 | पिंप्री खु | पिंप्री खु | 1134 | 2 | 1 | 1 |
| 24 | शेलगाव | शेलगाव | 951 | 2 | 1 | 1 |
| 25 | कासोळा | कासोळा | 2602 | 2 | 1 | 1 |
| 26 | बिटोडा भोयर | बिटोडा भोयर | 1321 | 2 | 1 | 1 |
| 27 | सार्सी | सार्सी | 1420 | 2 | 1 | 1 |
| 28 | गोलवाडी | गोलवाडी | 1835 | 2 | 0 | 2 |
| येदलपुर उजाड | 0 | |||||
| 29 | पिंपळगाव | पिंपळगाव | 2130 | 2 | 0 | 2 |
| 30 | वसंतवाडी | वसंतवाडी | 1900 | 2 | 1 | 1 |
| 31 | भडकुंभा | भडकुंभा | 997 | 2 | 1 | 1 |
| 32 | रामगड | रामगड | 1081 | 2 | 0 | 2 |
| 33 | दाभडी | दाभडी | 1167 | 2 | 1 | 1 |
| 34 | चिंचखेडा | चिंचखेडा | 1337 | 2 | 1 | 1 |
| 52329 | 68 | 25 | 43 | |||
| अ.क्र. | तालुका | रिक्त प्रभाग क्रमांक | वार्ड क्र. मध्ये समाविष्ट एरियाचे नाव/ चौक/ एरिया | सन 2011 च्या जणगणनेनुसार लोकसंख्या | शासन निर्णय मधील मापदंडानुसार अनुज्ञेय केंद्राची संख्या | कार्यरत सेतू संख्या | रिक्त सेतूची संख्या |
| 1 | मंगरुळपीर | 4 | अ.जाहेद अ सत्तार ट्रकवाले,नसरुद्दिन बैल व्यापारी,ईसमाईल मुक्का सर्व्हे न 95,96,97 व 145,146 रघुनाथ मांडवगडे, शकील मिस्त्री अ.रशीद बारुदवाले हाजी जकीऊला यांचे किराणा दुकान तयबा कलेक्शन कलदरीया हाईस्कुल | 2872 | 1 | 0 | 1 |
| कारंजा तालुका– ग्रामपंचायत माहिती | ||||||
| अ.क्र. | ग्रामपंचायतीचे नांव | समाविष्ट गावे | सन २०११ च्या जणगणनेनुसार लोकसंख्या | शासन निर्णय मधील मापदंडानुसार अनुज्ञेय केंद्राची संख्या | सेतू केंद्र संख्या | रिक्त सेतू संख्या |
| 1 | अखतवाडा | अखतवाडा | 1284 | 2 | 1 | 1 |
| पिंप्री (मोखड) | 417 | |||||
| 2 | बांबर्डा | बांबर्डा | 962 | 2 | 0 | 2 |
| 3 | बेंबळा | बेंबळा | 1775 | 2 | 1 | 1 |
| इसफूर उजाड | 0 | |||||
| हबदपुर उजाड | 0 | |||||
| 4 | भिवरी | भिवरी | 594 | 2 | 1 | 1 |
| नागलवाडी | 667 | |||||
| अंबोडा | 412 | |||||
| 5 | ब्राम्हणवाडा | ब्राम्हणवाडा | 749 | 2 | 1 | 1 |
| औरंगपूर | 76 | |||||
| मुर्तिजापुर उजाड | 0 | |||||
| 6 | दादगाव | दादगाव | 554 | 2 | 0 | 2 |
| 7 | धजन (बु.) | धजन (बु.) | 4284 | 2 | 1 | 1 |
| पेंढा उजाड | 0 | |||||
| 8 | धनज (खु.) | धनज (खु.) | 1189 | 2 | 1 | 1 |
| 9 | ढंगारखेड | ढंगारखेड | 582 | 2 | 0 | 2 |
| शहादतपूर | 413 | |||||
| 10 | दिघी | दिघी | 978 | 2 | 1 | 1 |
| 11 | डोंगरगाव | डोंगरगाव | 1011 | 2 | 1 | 1 |
| 12 | धोत्रा (जहा) | धोत्रा (जहा) | 1053 | 2 | 0 | 2 |
| मोरपूर | 2 | |||||
| 13 | गायवळ | गायवळ | 1226 | 2 | 1 | 1 |
| 14 | गिर्डा | गिर्डा | 782 | 2 | 1 | 1 |
| वाकी | 163 | |||||
| ममदाबाद ढोणी उजाड | 0 | |||||
| 15 | हिंगलवाडी | हिंगलवाडी | 1088 | 2 | 1 | 1 |
| रामटेक | 374 | |||||
| 16 | जानोरी | जानोरी | 743 | 2 | 1 | 1 |
| पानगव्हाण | 414 | |||||
| 17 | जयपुर | जयपुर | 645 | 2 | 0 | 2 |
| शिंगणापूर | 520 | |||||
| अजमपुर | 107 | |||||
| 18 | खानापुर | खानापुर | 1038 | 2 | 0 | 2 |
| बहादरपूर उजाड | 0 | |||||
| 19 | खेंर्डा (का) | खेंर्डा (का) | 1307 | 2 | 1 | 1 |
| बग्गी | 7 | |||||
| ब्राम्हणखेड | 0 | |||||
| इमामपूर | 0 | |||||
| खतनापुर | 0 | |||||
| 20 | किन्ही रोकडे | किन्ही रोकडे | 1025 | 2 | 1 | 1 |
| अलमगिरपूर उजाड | 0 | |||||
| अजमपुर उजाड | 0 | |||||
| 21 | माळेगाव | माळेगाव | 840 | 2 | 0 | 2 |
| 22 | मोहगव्हाण | मोहगव्हाण | 823 | 2 | 1 | 1 |
| नारेगाव | 574 | |||||
| 23 | मुरंबी | मुरंबी | 610 | 2 | 1 | 1 |
| तपोवन | 324 | |||||
| 24 | निंबा (ज) | निंबा (ज) | 776 | 2 | 1 | 1 |
| 25 | पलाणा | पलाणा | 977 | 2 | 1 | 1 |
| उजळेश्वर उजाड | 0 | |||||
| 26 | पसरणी | पसरणी | 1511 | 2 | 1 | 1 |
| मिर्झापूर उजाड | 0 | |||||
| इसापूर उजाड | 0 | |||||
| 27 | पिंपळगाव (बु.) | पिंपळगाव (बु.) | 575 | 2 | 0 | 2 |
| तामसवाडी उजाड | 0 | |||||
| इंगलखेड उजाड | 0 | |||||
| 28 | पिंपळगाव (खु.) | पिंपळगाव (खु.) | 615 | 2 | 1 | 1 |
| एकलारा उजाडा | 0 | |||||
| 29 | पिंप्री वरघट | पिंप्री वरघट | 872 | 2 | 1 | 1 |
| पिलखेडा | 318 | |||||
| 30 | पोहा | पोहा | 4930 | 2 | 1 | 1 |
| 31 | रामनगर | रामनगर | 1398 | 2 | 1 | 1 |
| जनुना | 513 | |||||
| पिंर्प्री फॅारेस्ट | 7 | |||||
| 32 | शेलूवाडा (शेलू बु.) | शेलूवाडा (शेलू बु.) | 1901 | 2 | 0 | 2 |
| 33 | शेवती | शेवती | 1382 | 2 | 1 | 1 |
| मांडवा | 755 | |||||
| देवचंडी उजाड | 0 | |||||
| 34 | सोमठाणा | सोमठाणा | 975 | 2 | 1 | 1 |
| गंगापूर | 194 | |||||
| बागापूर उजाड | 0 | |||||
| झोलगाव उजाड | 0 | |||||
| रापेरी उजाड | 0 | |||||
| 35 | सुकळी | सुकळी | 1399 | 2 | 1 | 1 |
| 36 | टाकळी खु. | टाकळी खु. | 442 | 2 | 0 | 2 |
| टाकळी बु. | 490 | |||||
| सुकळी उजाड | 0 | |||||
| 37 | तारखेडा | तारखेडा | 680 | 2 | 1 | 1 |
| 38 | तुळजापुर (ग्रामदान) | तुळजापुर (ग्रामदान) | 514 | 2 | 1 | 1 |
| 39 | विळेगाव | विळेगाव | 1280 | 2 | 1 | 1 |
| 40 | विरगव्हाण | विरगव्हाण | 722 | 2 | 1 | 1 |
| मुगुटपूर | 402 | |||||
| 41 | वडगाव (इजारा) | वडगाव (इजारा) | 1077 | 2 | 0 | 2 |
| 42 | वडगाव (र) | वडगाव (र) | 1063 | 2 | 1 | 1 |
| 43 | वाई (का) | वाई (का) | 1829 | 2 | 1 | 1 |
| 44 | वाल्हई | वाल्हई | 990 | 2 | 1 | 1 |
| नागापूर उजाड | 0 | |||||
| बागायत उजाड | 0 | |||||
| 45 | येवती | येवती | 1773 | 2 | 1 | 1 |
| 59972 | 90 | 34 | 56 | |||
| अ.क्र. | तालुका | रिक्त प्रभाग क्रमांक | वार्ड क्र. मध्ये समाविष्ट एरियाचे नाव/ चौक/ एरिया | सन 2011 च्या जणगणनेनुसार लोकसंख्या | शासन निर्णय मधील मापदंडानुसार अनुज्ञेय केंद्राची संख्या | कार्यरत सेतू संख्या | रिक्त सेतूची संख्या |
| 1 | कारंजा | 1 | मौजे भिलखेडा शेत सर्व्हे नं.२१६ सर्व्हे नं. १७इमामपुर स. नं. ३३ स. नं. ३४. बगायत स. नं. १६ ते स. नं. २४, मोहळ स. नं. २४ ते सर्व्हे नं. १ ते सर्व्हे नं. ९ रेल्वे लाइन, मौजे मोहळ शेत स. नं. २१ च्या मधुन रेल्वे लाईनने मर्यदित, मुर्तीजापुर रोड जैन मंदिर, भिलखेडा सर्व्हे नं. २३, १४, भिलखेडा सर्व्हे नं. १३, १२ १६ शहर सिमेपर्यंत. | 5023 | 2 | 1 | 1 |
| 4 | रेल्वे सिग्नल के. एन. कॉलेज रेल्वे क्रॉसिंग, दिल्ली गेट, शिवाजी चौक, जयस्तंभचौक, शताब्दी मार्केट, रेल्वे सिग्नल पर्यंत | 5115 | 2 | 1 | 1 | ||
| 5 | इंगोले यांचा जुना बंगला, गवळी पुरा रेल्वे लाईन, ताज चौक, शताब्दी मार्केट, जयस्तंभचौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, शहाकार यांचे दुकान, बस स्टैंड उके यांचे घर, तहसिल कार्यालय, वाणी यांचे घर टागोर विद्यालय ते रेल्वे लाईन | 4885 | 1 | 0 | 1 | ||
| 7 | भिलखेडा सर्व्हे नं. १ ते १०,भिलखेडा शेत सर्व्हे नं. १०, ११, ९ व ७ हनुमान मंदिर भिलखेडा सर्व्हे नं. २७ जैन मंदीर, महावीर आश्रम चौक, विठठल मंदीर, झांशी राणी चौक, पानविहीर सर्व्हे नंबर ५९, पानविहीर सर्व्हे नं. १०४, इमामपुर सर्व्हे नंबर ५६ ते नंबर ५६ ते काळी सर्व्हे नंबर ३, शेरपुर सर्व्हे नंबरं १, पोहा जंक्शन, नागापुर सर्व्हे नंबर १८, भिलखेडा सर्व्हे नं. १. | 6870 | 2 | 1 | 1 | ||
| 8 | विठठल मंदीर शहाकार यांचे दुकान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, स्टेट बैंक पोहा वेश टेलिफोन ऑफीस, भारती पुरा रोड, महावीर गार्डन, मानोरा रोड, सतगुरु चौक, झांशी राणी चौक मुर्तीजापूर रोड. | 4600 | 1 | 0 | 1 | ||
| 13 | गांधी चौक, महावीर चौक,न.प. वाचनालय, चिरफाड बंगला, एम. जे. ऊर्दू स्कूल, पोलिस क्वार्टर, दुल्हेमान दर्गा, धुमाळे घर | 5072 | 2 | 1 | 1 | ||
| 14 | आसरा माता आधारर, राजेंद्र भोजनालय, दुल्हे रहेमान दर्गा, पोलीस क्वार्टर, मंगरुळ वेश, काळी कारंजा सर्व्हे नंबर १६७, मानोरा रस्ता सर्व्हे नंबर १६९, सतगुरु चौक, रेस्ट हाऊस, रेणुका माता मंदीर. | 5024 | 2 | 1 | 1 |
| मानोरा तालुका– ग्रामपंचायत माहिती | ||||||
| अ.क्र. | ग्रामपंचायतीचे नांव | समाविष्ट गावे | सन २०११ च्या जणगणनेनुसार लोकसंख्या | शासन निर्णय मधील मापदंडानुसार अनुज्ञेय केंद्राची संख्या | सेतू केंद्र संख्या | रिक्त सेतू संख्या |
| 1 | अजनी | अजनी | 785 | 2 | 1 | 1 |
| 2 | आसोला (बू.) | आसोला (बू.) | 753 | 2 | 1 | 1 |
| 3 | भिलडोंगर | भिलडोंगर | 1393 | 2 | 1 | 1 |
| गिरट | 1006 | |||||
| 4 | देउरवाडी | देउरवाडी | 420 | 2 | 0 | 2 |
| चिखली | 988 | |||||
| गलमगाव | 200 | |||||
| 5 | गिर्डा | गिर्डा | 1421 | 2 | 0 | 2 |
| वार्डा | 391 | |||||
| खेर्डा | 726 | |||||
| 6 | गोंडेगाव | गोंडेगाव | 1072 | 2 | 1 | 1 |
| 7 | गोस्ता | गोस्ता | 1327 | 2 | 0 | 2 |
| 8 | हळदा | हळदा | 672 | 2 | 1 | 1 |
| जगदंबा नगर | 1079 | |||||
| 9 | हतना | हतना | 793 | 2 | 1 | 1 |
| 10 | हातोली | हातोली | 986 | 2 | 1 | 1 |
| 11 | कोलार | कोलार | 901 | 2 | 1 | 1 |
| पिंर्प्री | 588 | |||||
| 12 | कोंडोली | कोंडोली | 2558 | 2 | 1 | 1 |
| 13 | मेन्द्रा | मेन्द्रा | 499 | 2 | 1 | 1 |
| इंगलवाडी | 768 | |||||
| 14 | पारवा | पारवा | 1183 | 2 | 1 | 1 |
| 15 | रोहणा | रोहणा | 1061 | 2 | 1 | 1 |
| जवळा बु. | 180 | |||||
| जवळा खु. | 211 | |||||
| 16 | सावळी | सावळी | 1515 | 2 | 0 | 2 |
| 17 | सेवादासनगर | सेवादासनगर | 1299 | 2 | 1 | 1 |
| 18 | शेंदोना | शेंदोना | 2468 | 2 | 1 | 1 |
| 19 | वटफळ | वटफळ | 1629 | 2 | 1 | 1 |
| 20 | वापटा | वापटा | 1197 | 2 | 1 | 1 |
| हट्टी | 731 | |||||
| 30800 | 40 | 16 | 24 | |||