उद्दीष्ट व कार्य:-
तहसिलदार यांना तालुका दंडाधिकारी देखील म्हणतात. तहसिलदार हे जिल्हाधिकाऱ्यांच्या अधीन राहुन शासनाच्या धोरणांची अंमलबजावणी व समन्वय साधतात. त्यांची जबाबदारी महसुल कार्यकारी व न्याय विषयक बाबीवर असते.
महसुल व कार्यकारी कार्य:-
समन्वय व देखरेख:-
तहसिलदार हे मा. जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांच्यातील समन्वयक म्हणून कामकाज पाहतात. तसेच नायब तहसिलदार व निरिक्षण अधिकारी यांच्यकडुन महसुल कामकाजा बाबत व पुठवठा विषयक कामकाजा बाबत अंमलबजावणी करुन घेतात.
महसुल विषयक कार्य:-जमीनीच्या महसुल मुल्यांकना पासुन ते खाजगी व शासकिय जमीन महसुल (दंडात्मक) वसुली पर्यंतच्यासर्व प्रक्रियाचे निरिक्षण देखरेख करतात.
प्रतिनिधीक अधिकारः-जिल्हाधिकाऱ्याकडून काही विशिष्ट कायद्या अंतर्गत त्यांना अधिकार प्रदान केले जातात. ज्यामुळे ते महसुल विषयक बाबतीत सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्य करतात.
शासकिय मालमत्ताः-शासकिय मालमत्तचे संरक्षण करणे, अतिक्रमण रोखणे आणि जमीनीच्या भाडे धारण अटीचे उल्लघन हाताळणे,
भू-राजस्वः- (लॅन्ड रेव्हेन्यु):- बिगर शेती अमुल्यांकन आकारणी, विविध महसुल विषयक आदेश पारीत करणे आणि सरकारी महसुल वसुलीचे निरिक्षण करणे.
जमीनीचे अधिग्रहणः जमिनीच्या अधिग्रहण प्रक्रियेमध्ये सहभाग करतात.
महसुली प्रकरणे:- महसुल प्रकरणात न्याय निवाडा करणे.
पीक व सिमाकंन निरिक्षणः पीक आणि हद्य चिन्हाची तपासणी करणे. तसेच महसुल सवलती आणि सवलतीसाठभ् पीक उत्पादनाच्या अंदाजाची पडताळणी करणे,
विकास विषयक कार्यः महसुल, कृषी, पशु संवर्धन आणि सार्वजनिक आरोग्य् या सारख्या विभागाच्या अधिकाऱ्याच्या कामाचा तालुकास्तरावर समन्वय साधणे.