खाजगी जमिनींचे अधिग्रहण सार्वजनिक उद्देशांसाठी जसे की रस्ते बांधकाम, सिंचन प्रकल्पांसाठी शासन करत असते. खाजगी जमीन संपादनाच्या प्रस्तावांची पाठवणी विशेष जमीन संपादन अधिकाऱ्याकडे केली जाते. हे प्रस्ताव तपासले जातात आणि अंदाजपत्रकाची तरतूद प्रमाणपत्र, प्रशासकीय मान्यता प्रमाणपत्र, तांत्रिक मंजुरी आदेश यांचीसुद्धा छाननी केली जाते. तसेच संबंधित यंत्रणांनी सादर केलेली माहितीही असते.
यानंतर त्या जमिनीचे संयुक्त मोजमाप केले जाते. जमीनधारकांच्या हरकती मागविल्या जातात आणि त्यांचे निराकरण केले जाते. चौकशीदरम्यान कोणत्याही हरकती प्राप्त झाल्यास, त्या संबंधित यंत्रणेच्या विभागीय कार्यालयामार्फत सोडविल्या जातात.
नगररचना व मूल्यनिर्धारण विभाग संपादनासाठीच्या जमिनीचा मोबदला ठरवतो. विभागाकडून जाहीरनाम्यानंतर मोबदला दिला जातो.
मोबदला देऊनही जर त्यावरून लागवड करणारे किंवा मालकी हक्कांमध्ये वाद निर्माण झाला असेल, तर अशा बाबतीत मोबदला जिल्हा दिवाणी न्यायाधीशांच्या/ प्राधिकरणाच्या नावे जमा केला जातो
संपर्क साधा -:
दूरध्वनी क्रमांक: 07252-234336
ई-मेल: laowashim@gmail.com
अधिक माहितीसाठी संपर्क साधावा: उपजिल्हाधिकारी भूसंपादन , जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम
