• साइट नकाशा
  • Accessibility Links
बंद

पुनर्वसन शाखा

जिल्हाधिकारी कार्यालय,वाशिम येथिल पुनर्वसन विभाग जिल्हयातील प्रभावित व्यक्तीच्या पुनर्वसनाशी संबंधित सर्व बाबीवर देखरेख,मार्गदर्शन आणि नियंत्रण ठेवण्याचे कार्य करतो. तसेच, प्रकल्प प्राधिकरणांसोबत समन्व्य साधुन वेगवान आणि प्रभावी पुनर्वसन सुनिश्चित करतो.

पुनर्वसन विभाग,वाशिम यांची कार्ये

देखरेख समन्वय :-

पुनर्वसन शाखा ही पुनर्वसनाच्या प्रयत्नासांठी एक प्रमुख केंद्र म्हणुन कार्य करते. विविध प्रकल्प प्राधिकरणांसोबत समन्वय साधुन प्रभावित व्यक्तीच्या सुरळीत व वेळेत पुनर्वसनाची व्यवस्था सुनिश्चित करते.

निगराणी पुनर्वसन :-

पुनर्वसन कार्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवुन संबंधित जिल्हाधिकारी व अधिकाऱ्यांना प्रभावित व्यक्तीच्या स्थितीबाबत माहिती प्रदान केली जाते

प्राथमिक अधिसुचना :-

संबंधित कायदयाच्या कलम 11(1) नुसार,प्रकल्पामुळे संभाव्य प्रभावित किंवा लाभार्थी असलेल्या गावांची किंवा क्षेत्रांची प्राथमिक अधिसुचना शासकीय राजपत्रात प्रकाशित केली जाते.

इतर कार्ये :-

राज्य सरकारच्या निर्देशानुसार वेळोवेळी इतर आवश्यक कार्येही पुनर्वसन शाखेव्दारे पार पडतात.

जिल्हा स्तरावर :-

पुनर्वसन शाखा ही जिल्हाधिकारी कार्यालयाचा एक महत्वाचा भाग असुन,जिल्हाधिकारी हे महसुल प्रशासनाचे प्रमुख अधिकारी असतात तसेच जिल्हयातील सर्व राज्य सरकारी विभागांचे समन्वयक म्हणुन कार्य करतात.

सहाय्यक अधिकारी :-

जिल्हाधिकारी यांना अतिरिक्त जिल्हाधिकारी व इतर अधिकारी यांचे सहकार्य असते. यात प्रभारी अधिकारी पुनर्वसन यांचा समावेश असुन,ते पुनर्वसन शाखेच्या कार्यावर देखरेख ठेवतात.