२. मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती (Post- Matric Scholarship)

इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग यासाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजने अंतर्गत खलीलप्रमाणे ९ योजना रबिवण्यात येतात.
१. विजाभज विद्याथ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती (राज्य प्रायोजित)
पात्रता–
१. विद्यार्थी हा विजाभज प्रवर्गाचा असावा
२. पालक/पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. १.५० लाख पेक्षा कमी किवा समान असावे
३. उत्पन्नाचा दाखला व जातीचे प्रमाणपत्र,
४. महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र
५. शैक्षणिक पात्रता इ.१० वी पास व पुढील शिक्षण चालू असावेत
६. अर्जदार फक्त व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी CAP फेरीतून आलेला असावा
देय रककम–
१. शिक्षण फी, परिक्षा फी, निर्वाहभत्ता आणि इतर शुल्क, या शुल्काच्या बाबी नियामक प्रधिकरणाने व तत्सम प्रधिकरणाने मंजुर केलेले दर
२. या योजनेचे लाभ १००% आहेत
लाभाचे स्वरूप
ट्यूशन फी, परीक्षा शुल्क, देखभाल भत्ता, इतर फी
२. विजाभज विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क (राज्य योजना)
पात्रता–
१. विद्यार्थी हा विजाभज प्रवर्गाचा असावा
२. विद्यार्थी शालांत परिक्षोत्तर शिक्षण घेणारा असावा.
३. पालक/पालकांचे वार्षिक उत्पन्न रु.८ लाख पेक्षा कमी किंवा समान असावे
४. अर्जदार फक्त व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी CAP फेरीतून आलेला असावा
देय रककम–
- शिक्षण फी, परिक्षा फी, निर्वाहभत्ता आणि इतर शुल्क, या शुल्काच्या बाबी नियामक प्रधिकरणाने व तत्सम
प्रधिकरणाने मंजुर केलेले दर
लाभाचे स्वरूप
- ट्यूशन फी, परीक्षा शुल्क, देखभाल भत्ता, इतर फी
३. इयत्ता १० वी च्या परिक्षेत विशेष प्राविण्य मिळवून इयत्ता ११ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या तसेच इ.१२ वी मध्ये शिकणाऱ्या विजाभज / विमाप्रवर्गाच्या मुला मुलींना राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती (राज्य योजना)
पात्रता–
१. विद्यार्थी हा विजाभज / विमाप्र प्रवर्गाचा असावा.
२. विद्यार्थी इयत्ता ११ वी व १२ वी कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणारा असावा.
३. सदरील शिष्यवृत्ती करिता उत्पन्नाची अट नाही.
४. विद्यार्थ्यास इयत्ता १० वी मध्ये ७५ टक्के व त्या पेक्षा जास्त गुण मिळणे आवश्यक आहे.
५. ही शिष्यवृत्ती भारत सरकार शिष्यवृत्ती व इतर गुणवत्ता शिष्यवृत्ती योजने व्यतिरिक्त असेल
देय रककम– प्रतिमाह रु. ३०० प्रमाणे १० महिन्यांसाठी रु. ३,०००/- इतका लाम देण्यात येतो
लाभाचे स्वरूप : ११ वी आणि १२ वी मध्ये शिकणाऱ्या अर्जदारांना शिष्यवृत्ती रु. ३००/- दरमहा आणि १० महिन्यासाठी रु. ३०००/-
४. OBC, VJNT आणि SBC प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण शुल्काची
प्रतिपूर्ती (राज्य योजना)
पात्रता–
१. सरकारी कौशल्य विकास संस्था किंवा खाजगी संस्थेमध्ये PPP योजनेद्वारे घेतलेले प्रवेश आणि केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश.
२. एकूण कौटुंबिक उत्पन्न रु.८.०० लाख पेक्षा कमी किंवा तितके असावे, नॉन क्रीमीलेयर प्रमाणपत्र आवश्यक आहे
३. DGT, नवी दिल्ली किंवा MSCVT मान्यताप्राप्त अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतला असावा.
देय रककम–
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अभ्यासक्रमांसाठी गठीत केलेले प्रशिक्षण शुल्क वजा जाता, उर्वरित प्रशिक्षण शुल्काच्या ८० टक्के इतक्या रकमेची प्रतिपूती विजामज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्याथ्यांना अनुज्ञेय राहील
लाभाचे स्वरूप
ट्यूशन फी, परीक्षा शुल्क
सदर योजनेचा लाभ घेण्याची कार्यपद्धती
१. या सर्व योजनांचे संगणकीकरण झालेले असून https://mahadbt.maharashtra.gov.in ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे या वेबसाईटवर उपलब्ध आहे या योजनेच्या अधिक माहितीसाठी सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण वाशिम तसेच संबधित शाळा महाविद्यालयाचे प्राचार्यांशी संपर्क साधावा.
२. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून विजाभज व विमाप्र प्रवर्गातील उमेदवारांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्याची योजना (मागेल त्याला प्रशिक्षण) ही राज्यस्तरीय योजना आहे. विमुक्त जाती / भटक्या जमाती / विशेष मागास प्रवर्गासाठी ही योजना लागू आहे. संबंधित संस्थांच्या प्राचार्यांनी पात्र विद्यार्थ्यांचे प्रस्ताव तयार करून संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई या कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे अधिक माहितीकरिता संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई, संबंधित शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण वाशिम यांच्याशी संपर्क साधावा.
https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे
३. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकणा-या विजाभज / विमाप्र विद्यार्थ्यांना विद्यावेतन ही राज्यस्तरीय योजना आहे. विमुक्त जाती / भटक्या जमाती / विशेष मागास प्रवर्ग करिता योजना आहे. सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण वाशिमयांच्याशी अधिक माहितीकरिता संपर्क साधावा. https://mahadbt.maharashtra.gov.in उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.