वाशिम शहर वाकाटक राज्याची राजधानी होती. वाकाटक राजानी तीस-या शतकपासून सहाव्या शतकापर्यंत राज्य केले. सदर राज्य हे मध्यप्रदेश पासून बेरार आंध्रप्रदेश पर्यंत होते. विन्ध्ये- शक्ती हा प्रथम वाकाटकचा राजा होता. सर्वसेन या राजाने वत्सगुल्म (वाशिम) ला राजधानी घोषित केले होते. त्यांचा हरीविजय व गाथासप्तषदी हे दोन ग्रंथ प्रसिद्ध आहेत. अजिंठा येथील लेण्यांना वाकाटक राजानेच प्रोत्सहन दिल्याचे दाखले आहेत. तसेच वाशिम जिल्हयाचे पूर्वीचे नाव वत्सगुल्म असे होते.
वाशिम उपविभागीय अधिकारी कार्यालय हे वाशिम जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी आहे. वाशिम उपविभागीय अधिकारी कार्यालय अंतर्गत तीन तहसील कार्यालये आहेत: 1. तहसिल कार्यालय वाशिम, 2. तहसिल कार्यालय रिसोड, 3. तहसिल कार्यालय मालेगांव
अ.क्र. | अधिकारी यांचे नाव | पदनाम | संपर्क क्रमांक |
1 | निलेश पळसकर | तहसिलदार वाशिम | 07252-232008 |
2 | प्रतिक्षा तेजनकर | तहसिलदार रिसोड | 07251-222316 |
3 | दिपक पुंडे | तहसिलदार मालेगांव | 07254-271373 |