रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा या भावनेतून पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांनी रिठद (जि. वाशिम) येथे नव्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण केले. यावेळी जिल्ह्यातील १० प्राथमिक आरोग्य केंद्रांचे ऑनलाईन उद्घाटन देखील करण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा अधिक बळकट होणार आहेत.