कारंजा उपविभागीय अधिकारी कार्यालय हे वाशिम जिल्ह्याच्या मुख्यालया पासुन, सुमारे 65 किलोमिटर अंतरावर आहे. उपविभागीय अधिकारी कार्यालय कारंजा ची स्थापना दि. 25.8.2014 रोजी झाली आहे. उपविभागीय अधिकारी कार्यालय कारंजा अंतर्गत दोन तहसील कार्यालये आहेत: 1. तहसिल कार्यालय कारंजा, 2. तहसिल कार्यालय मानोरा
उपविभागीय कार्यालय कारंजा
उपविभागीय अधिकारी (SDO), ज्यांना उपविभागीय दंडाधिकारी (SDM) देखील म्हणतात, हे उपविभागाचे प्रमुख नागरी अधिकारी असतात. ते जिल्हाधिकाऱ्यांच्या अधीन राहून शासनाच्या धोरणांची अंमलबजावणी व समन्वय साधतात. त्यांची जबाबदारी महसूल, कार्यकारी व न्यायविषयक बाबींवर असते.
महसूल व कार्यकारी कार्ये:
समन्वय व देखरेख:- SDO/SDM हे उपविभागातील तहसीलदार व मा. जिल्हाधिकारी यांच्यातील समन्व्यक म्हणूण कामकाज पाहतात. तसेच तहसलिदार यांच्याकडून महसूली कामकाज बाबत अंमलबजावणी करुन घेतात.
महसूल विषयक कार्य:- जमिनीच्या महसूल मूल्यांकनापासून ते खाजगी व शासकीय जमीन महसूल (दंडात्मक) वसुली पर्यंतच्या सर्व प्रक्रियांचे निरीक्षण आणि देखरेख करतात.
प्रतिनिधिक अधिकार:- जिल्हाधिकाऱ्यांकडून काही विशिष्ट कायद्यांतर्गत त्यांना अधिकार प्रदान केले जातात, ज्यामुळे ते महसूल विषयक बाबतीत प्रथम श्रेणी सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्य करतात.
शासकीय मालमत्ता:-शासकीय मालमत्तेचे संरक्षण करणे, अतिक्रमण रोखणे आणि जमिनीच्या भाडेधारणा अटींचे उल्लंघन हाताळणे.
भू-राजस्व (लँड रेव्हेन्यू):- बिगर शेती मूल्यांकन आकारणी, विविध महसूल विषयक आदेश पारित करणे आणि सरकारी महसूल वसुलीचे निरीक्षण करणे.
जमिनीचे अधिग्रहण:- जमिनीच्या अधिग्रहण प्रक्रियेमध्ये सहभाग.
अपील:-मामलतदारांनी घेतलेल्या निर्णयांविरुद्ध अपील ऐकणे व मुदतीच्या डिक्रीच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवणे.
पीक व सीमांकन निरीक्षण:-पीक आणि हद्द चिन्हांची तपासणी करणे तसेच महसूल सवलती आणि सवलतीसाठी पीक उत्पादनाच्या अंदाजांची पडताळणी करणे.
उत्तराधिकार:-वतन (पारंपरिक जमीनधारण) आणि इतर मालमत्तेच्या उत्तराधिकार प्रकरणे हाताळणे.
विकास विषयक कार्य:-महसूल, कृषी, पशुसंवर्धन आणि सार्वजनिक आरोग्य यांसारख्या विभागांच्या अधिकाऱ्यांच्या कामाचा समन्वय साधणे.
अ.क्र. | अधिकारी / कर्मचारी यांचे नांव | पदनाम | भ्रमणध्वनी क्रमांक | प्रशासकीय कामकाज स्वरुप सविस्तर | पर्यवेक्षकीय अधिकारी |
01 | श्री कैलास देवरे | उपविभागीय अधिकारी, | 07256-222500 | कार्यालय प्रमुख | मा.जिल्हाधिकारी वाशिम |
02 | श्री गिरीष राठोड | नायब तहसिलदार | 7218266702 | कार्यालयीन कामकाजावर पर्यवेक्षण | उपविभागीय अधिकारी |
03 | रिक्त | निन्मश्रेणी लघुलेखक | – | महसुल प्रकरणे, उविअ.यांची दौरा दैनंदिन, महाराजस्व सभा टिपणी, बैठका-सभा | उपविभागीय अधिकारी |
04 | श्री प्रविण चव्हाण | सहाय्यक महसुल अधिकारी | 9529850223 | प्रस्तुतकार-1 , जमीन महसूल प्रकरणे, भोगवटादार वर्ग 2 नझुल, जमीन/ शेत जमीन बँकेकडे गहान ठेऊन गहाणखत परवानगी मिळणेबाबतची प्रकरणे, सिलिंग जमीन विक्री परवानगी बाबतचे प्रकरणे, अकृषक/NA प्रकरणे, शासकीय जमीन मागणी प्रकरणे, भोगवटादार वर्ग 2 मधून वर्ग 1 करणेबाबतचे प्रकरणे, तुकडेबंदी अधिनियमानुसार जमीन विक्री परवानगी प्रकरणे, ज्येष्ठ नागरीक प्रकरणे, अज्ञान पालनकर्ता प्रकरणे, ऐपतीचे दाखले | नायब तहसिलदार |
05 | श्री नितीन लव्हाळे | सहाय्यक महसुल अधिकारी | 9767059781 | महसूल अपील प्रकरणे, गौनखनीज प्रकरणे, विविध समित्या, नैसर्गिक आपत्ती, विविध, शस्त्र परवाना नुतणीकरण प्रकरणे, फटाका परवाना नुतणीकरण प्रकरणे, कायदा व सुव्यवस्था प्ररकणे, पोलीस पाटील आस्थापना, शेतकरी आत्महत्या प्रकरणे, पाणी टंचाई प्रकरणे, लेखापुस्तक अद्यावत ठेवणे, सेवानिवृत्ती नंतरचे लाभ अदा करणे
,वेतन देयके व इतर कार्यालयीन देयके , फॉर्म नं. 16 तयार करणे/रिर्टन भरणे/कार्यालयाचे टॅक्स/जीएसटी भरणे, लेखाविषयक सर्व बाबी, सेवापुस्तक अद्यावत करणे, e-HRMS, विभागीय चौकशी प्ररकणे, आस्थापना विषयक न्यायालयीन प्रकरणे, गोपनिय अहवाल/ मत्ता दायित्व, आस्थापना विषयक सर्व पत्र व्यवहार
|
नायब तहसिलदार |
06 | श्री संजय राठोड | महसुल सहाय्यक | 9623581764 | फौजदारी प्रकरणे, हिट अँड रन प्ररकणे, SC/ST दक्षता समिती
नॉन क्रिमिलेअर/जात प्रमाणपत्र निर्गमित करणे, नॉन क्रिमिलेअर प्रमाणत्राची चौकशी करून चौकशी अहवाल सादर करणे, सेतु विषयक इतर पत्र व्यवहार., महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 |
नायब तहसिलदार |
07 | रिक्त | महसुल सहाय्यक | – | भुसंपादन, आवक जावक
लोकसभा निवडणूक/विधानसभा निवडणूक/नगर परीषद/जि.प. निवडणूक/कृषी उत्पन्न बाजर समिती निवडणूक इ., कार्यालयाचे नझारत (खर्च) विषयक सर्व बाबी पाहणे.
|
नायब तहसिलदार |
08 | रिक्त | वाहन चालक | – | उपविभागीय अधिकारी यांचे वाहन, | उपविभागीय अधिकारी |
09 | श्री विलास ठाकरे | शिपाई | 7020194572 | उपविभागीय अधिकारी यांचे दालन, डाक वाटप | नायब तहसिलदार |
10 | रिक्त | शिपाई | – | डाक वाटप व इतर कामकाज | नायब तहसिलदार |
अ.क्र. | मंजूर पदे | मंजूर संख्या | कार्यरत संख्या | रिक्त | एकूण |
1 | उपविभागीय अधिकारी | 1 | 1 | 0 | 1 |
2 | नायब तहसिलदार | 1 | 1 | 0 | 1 |
3 | निम्नश्रेणी लघुलेखक | 1 | 0 | 1 | 1 |
4 | सहायक महसूल अधिकारी | 2 | 2 | 0 | 2 |
5 | महसूल सहायक | 2 | 1 | 1 | 2 |
6 | वाहन चालक | 1 | 0 | 1 | 1 |
7 | शिपाई | 2 | 1 | 1 | 2 |
एकूण | 10 | 6 | 4 | 10 |