• साइट नकाशा
  • Accessibility Links
बंद

सेवा पंधरवडा: मंगरूळपीर रामगाव येथे आदीसेतू शिबिर उत्साहात संपन्न

आदिसेतू अभियान अंतर्गत मंगरूळपीर तालुक्यातील मौजे रामगाव येथे कॅम्प आयोजित करण्यात आला होता यावेळी जिल्हाधिकारी वाशिम श्री .योगेश कुंभेजकर, अप्पर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील यांचेसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते… यावेळी रामगाव मोत्सावंगा येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नागरिकांनी गावात भेट देणाऱ्या अधिकारी वर्गाचे उस्फुर्तपणे वाद्य वाजवून, मिरवणूक काढून स्वागत केले.. यावेळी विविध योजनांची माहिती संबंधित विभागाचे अधिकारी यांनी दिली आरोग्य विभागातर्फे तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते…..गावचे स्थापणे पासून आदिवासी गावास भेट देणारे पहिले जिल्हाधिकारी असल्याची भावना यावेळी गावकरी यांनी व्यक्त केली