• साइट नकाशा
  • Accessibility Links
बंद

श्री.मुर्डेश्वर मंदिर, ता. रिसोड (रिठद)

श्रेणी धार्मिक

रिठद गावाचे नाव आधी रिध्दपुर होते ज्यावेळी राम सीतेच्या शोधासाठी परिभ्रमण करत होते त्यावेळी रिठद येथे  हेमाडपंथी पुरातन मंदिरामध्ये रामाने अभिषेक केला अभिषेक करून बाहेर पडले यावेळी मूर्तींनी आपले तोंड फिरवले  म्हणजे मुरडले म्हणून या मंदिराचे नाव मुर्डेश्वर असे पडले.  भारतामध्ये ही एकच पूर्वमुखी मूर्ती आहे . कालांतराने अयोध्या  येतील शोध पथक ज्या-ज्या ठिकाणी रामाने परिगमन केले त्या त्या ठिकाणीच्या  नोंदीचा संग्रह शोध पथकाने केल्यामुळे  रिठद या ठिकाणी अयोध्ये वरून रामाच्या पादुका सुद्धा या ठिकाणी देण्यात आल्या त्या रामाच्या पादुकाचे देखील या ठिकाणी सौंदर्यकरण करण्यात आले आहे . रामाने परिभ्रमण करत असलेल्या ठिकाणाचा जो भारताला नकाशा अयोध्या येथील शोध पथकाने केलेला  आहे त्या नकाशाचे ७१  नंबर वर वाशिम जिल्ह्यातील रिठद स्थळाची नोंद आहे. रिद्धपूर या नावाचा अपभ्रंश कालांतराने रिध्दपुरचे रिठद असे नामकरण झाले. हेमाडपंथी मंदिर जीर्ण झाल्यामुगावकरी मंडळींना मूळ मूर्तीला न हलवता मंदिराचा जिर्णोद्धार केला                                                                                                                                                                     .Murdeshwar Temple