बंद

श्री. संत झोलेबाबा संस्थान चिखली, ता. मंगरुळपीर

श्रेणी धार्मिक

श्री संत झोलेबाबा संस्थान चिखली र. नं 1343
मंगरूळपीर ते शेलुबाजार रोडवर शेलुबाजार पासून दोन किमी अंतरावर वसलेले चिखली हे गाव आहे ह्या ठिकाणी प्रसिद्ध अवलिया संत झोले बाबा यांचे समाधी स्थान असून दर पौर्णिमेला येथे भाविक भक्तांच्या श्री भोले बाबांच्या दर्शनाकरिता रांगा लागतात. झोले बाबा संस्थान हे 6962.63 चौ. मी. क्षेत्रावर वसलेले असून भक्तनिवास उत्तरेकडून हॉल व खोल्यांचे बांधकाम केलेले आहे तसेच पूर्वेकडील मुख्य प्रवेश द्वारा जवळ हॉल स्वयंपाक घर पाणी टाकी विहीर कुपनलिका इत्यादीचे क्षेत्र बांधकामात समाविष्ट आहे झोले बाबा संस्थान चिखलीचे नावे खरेदी हक्काने घेतलेली स्व-मालकीची 2.हे. 59 आर जमीन. व दानपत्रद्वारे मिळालेली गोगरी येथील 0.87आर अशी ऐकून 3 हे 46 आर जमीन संस्थांच्या नावे आहे. संस्थांमध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबविले जातात त्यात प्रामुख्याने वृक्षारोपण करणे गोरक्षण वारकरी शिबिर तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेचे पारायण भजन स्पर्धा ज्यामधून समाजाची हित साधले जाते व प्रबोधन होते अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम वर्षभर घेतले जातात संस्थांमध्ये अनेक प्रकारचे सण उत्सव महोत्सव साजरे केले जातात महाराजांची पुण्यतिथी अश्विन शुद्ध दसमी ला साजरी केली जाते कृष्णाष्टमी रामनवमी पौर्णिमा एकादशी पंढरपूर यात्रेकरिता येणाऱ्या जाणाऱ्या भाविक भक्तांचे स्वागत खानपान व्यवस्था संस्थान कडून विनामूल्य केल्या जाते दैनंदिन हरिपाठा चा कार्यक्रम होतो खास करून वर्षातून एकदा होणारा पौष पौर्णिमेचा यात्रा महोत्सव हा सर्वात मोठा उत्सव आहे यात्रेमध्ये लाखोच्या संख्येने यात्रेकरू भाविक भक्त आपली उपस्थिती लावतात व महाप्रसादाचा लाभ घेतात येथे महाप्रसाद रांगेत ट्रॅक्टर ट्रॉली द्वारे वाटप होतो परिसरातील 50 ते 60 चे वर ट्रॅक्टर प्रसाद वाटपाकरिता आपली हजेरी लावतात श्री संत झोलेबाबा संस्थान चिखली हे वाशिम जिल्ह्यातील एकमेव संस्था असून या संस्थांना शासनाकडून ब’दर्जा प्राप्त झालेला आहे.

श्री संत झोलेबाबा संस्थान चिखली