चिया बियाणे लागवड:
• माती - हलकी ते मध्यम चिकणमाती आणि वाळूची जमीन, तापमान: ६-८, पाण्याचा चांगला निचरा होणारी, मध्यम सुपीक जमीन. • तापमान - किमान - ११ °से, कमाल - ३६ °से.
इष्टतम तापमान श्रेणी -१६-२६ °से
• पेरणी हंगाम - रब्बी (१ ऑक्टोबर ते १५ डिसेंबर) • बियाणे - १.५ - २ किलो प्रति हेक्टर
• बियाणे प्रक्रिया - ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम / किलो बियाणे • पेरणी अंतर - ४५ x ३० सेमी, पेरणीची खोली - १.५ सेमी • सिंचन - हवामान, पाऊस आणि वाढीच्या अवस्थेनुसार २ ते ६ सिंचन. चिया वनस्पती दुष्काळ सहनशील असतात आणि कमीत कमी पाण्याने वाढू शकतात. • काढणी - ९०-१२० दिवस
• उत्पादन - १०-१२.५ क्विंटल प्रति हेक्टर
• बियाण्याची गुणवत्ता - शुद्धता: ९९.५ - ९९.९%, आर्द्रता < ८%, एकसारखे बियाणे, मोहरी आणि इतर जड पदार्थांपासून मुक्त.
• लागवडीचा खर्च - ३७५०० - ४०००० रुपये प्रति हेक्टर (शेतकरी पद्धतीनुसार)