सेवा पंधरवड्यातील या उपक्रमांचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा जिल्हाधिकारी यांचे आवाहन
सेवा पंधरवडा २०२५ ✨🌾
जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सांगितले की,
महसूल विभागाच्या महाराजस्व अभियानात यावर्षी शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांसाठी विशेष उपक्रम राबविले जात आहेत.
✅ पांदन रस्त्यांची नोंद – गावपातळीवरील वाद टाळण्यासाठी शेतरस्ते, पांदनरस्त्यांची नोंद शासनस्तरावर केली जाणार 🚜
✅ विशेष शिबिरे व ग्रामसभा – नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी थेट गावपातळीवर उपाययोजना 🏡
✅ आदी सेतू जनसंवाद – गावभेटी दरम्यान शेतकऱ्यांशी थेट संवाद, अडचणींवर त्वरित उपाय 💬
✅ महास्वामित्व योजना – ड्रोन सर्वेक्षण पूर्ण, गावठाणातील मालकी हक्क सनद वाटपाचे नियोजन 🗂️
📢 जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन :
“सेवा पंधरवड्यातील या उपक्रमांचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा व अभियानाला सहकार्य करावे.”
#सेवा_पंधरवडा #महाराजस्वअभियान #शेतकरीसंवाद #वाशिम